Nashik Crime News | भीषण अपघातात दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | नाशिकमधील सिन्नर घोटी हायवेवर आगसखिंड शिवारात सकाळी दहाच्या सुमारास एचपी गँस टँकर व अँक्टिवा यांच्यात भीषण अपघात होऊन दोन शाळकरी मित्रांचा मृत्यू झाला आहे. शुभम रामनाथ बरकले व दर्शन शांताराम आरोटे (वय 16) असे अपघातात (Nashik Crime News) मृत पावलेल्या मित्रांची नावे आहेत.

 

आज 10 वीचा बोर्डाचा पेपर असल्याने हे दोघे मित्र अँक्टिवा घेऊन जनता विद्यालय पांढुर्ली येथे पेपर देण्यासाठी जात होते.
गावाच्या काही अंतर पुढे गेल्यावर डी. एड काँलेजसमोर त्यांची गाडी गँस टँकरला धडकली.
हि धडक एवढी भीषण होती कि दोघां मित्रांचा जागीच मृत्यू झाला. (Nashik Crime News)

 

या दोन्ही मित्रांनी चांगल्या मार्काने दहावी पास होण्याचे स्वप्न पहिले होते. तशी त्यांनी तयारीसुद्धा केली होती.
मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. या दोन्ही मित्रांचा दुर्दैवी अपघात झाल्याने त्यांचे चांगल्या मार्काने दहावी पास होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
या दुर्दैवी घटनेमुळे बरकले व आरोटे कुटुंबियांवर मोठा डोंगर कोसळला आहे. तसेच या दोन्ही मित्रांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Web Title :- Nashik Crime News | nashik 10th standards dream remained unfulfilled two friends were killed in an accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Pune Crime News | पत्नीवर वार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

SSC Exam | ऑल द बेस्ट! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु, राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी देणार परीक्षा