Nashik Gangapur Police | रस्त्याने येणारे जाणारे वाहनांच्या काचा फोडुन दहशत निर्माण करणारी टोळी गजाआड, पोलिसांनी काढली धिंड (Video)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Gangapur Police | रस्त्याने येणाऱ्या-जाणारी वाहने आडवून वाहन चालकांसोबत हुज्जत घालून गाडीच्या काचा फोडून तसेच चाकूने प्राणघातक हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करुन दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला गंगापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई दिंडोरी तालुक्यातील कोकणगांव येथे करण्यात आली आहे.

अनिकेत उर्फ अंडया पप्पु शार्दुल (वय-१९ रा.राजीवनगर, गोवर्धन गांव, नाशिक), प्रतिक विष्णु जाधव (वय-१९ रा. मोतीवाला कॉलेजसमोर, दत्तमंदीर, शिवाजीनगर, नाशिक), विजय दादु खोटरे (वय-१९ रा. विठठल रुक्मिणी मंदीरासमोर, भवर टॉवर, शिवाजीनगर, नाशिक), कपिल उर्फ चिंटु बाळु गांगुर्डे (वय २१ रा. मोठा राजवाडा, गंगापुर गांव, नाशिक), रोहित उत्तम वाडगे (वय-१९ रा. चावडीजवळ, मोठा राजवाडा, गंगापुर गांव, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत जय चंद्रकांत गजभिये यांनी गंगापुर पोलीस ठाण्यात 13 फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी ३०७, ३०८,३४१, ३३६, १४३,१४८,१४९, ४२७, ५०४, ५०६, ३४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी जय गजभिये हे 13 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हुंदाई कारमधून (एमएच-१५-एचक्यु-०७१०) मित्र कुशल अरुण भगत व ओमकार वाळुंज यांच्या सोबत गिरणारे रोडने नाशिककडे येत होते. गंगापुर गांव जकात नाक्याजवळ त्यांच्या गाडीच्या समोर अनोळखी इसमांनी आडवे होवुन गाडी अडवुन त्यांचेशी हुज्जत घालुन गाडीची पाठीमागील बाजुच्या काचेवर दगड मारुन काच फोडुन नुकसान केले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारला असता आरोपींपैकी एकाने त्याचेकडील चाकुने प्राणघातक हल्ला करुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी मयुर रघुनाथ मोरे (रा. मुपो. खंबाळे (त्र्यंबक रोड येथे मळ्यात) ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक)
यांची टाटा व्हिस्टा कार (एमएच-१५-डीएम-८२३२) व विजय नथु रसाळ (रा. फलॅट नं.६, आकार रेसीडेन्सी,
ध्रुवनगर, गंगापुर शिवार, नाशिक) यांचा टेम्पो (एमएच-१६-एई-४८५२)
देखील आरोपींनी दगड मारुन काचा फोडल्याची माहिती जय गजभिये यांनी दिल्याने पोलिसांनी
अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ किरणकुमार चव्हाण,
सहायक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिध्देश्वर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली
गंगापुर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे,
पोलीस उप निरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार गिरीष महाले, रविंद्र मोहिते,
गणेश रहेरे, पोलीस नाईक मच्छिंद्र वाकचौरे, पोलीस अंमलदार सोनु खाडे, गोरख साळुंके,
भागवत थविल यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त