देशात प्रवास करणार्‍या तसेच परदेशातून येणार्‍यांना केलं जातंय क्वारंटाईन, संख्या पोहचली ‘एवढ्या’ लाखांवर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुमारे 23 लाख लोक, ज्यांनी लॉकडाऊन दरम्यान देशांतर्गत एका ठिकाणाहुन दुसर्‍या ठिकाणी प्रवास केला आहे किंवा परदेशातून आले आहेत, ते सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यांची क्वारंटाइनची व्यवस्था राज्य आणि केंद्र शासीत प्रदेशांकडून करण्यात आली आहे. बहुतांश राज्य सरकार आणि केंद्र शासीत प्रदेशांच्या प्रशासनाने आपल्या येथे येणार्‍या लोकांसाठी किमान सात दिवसांचे क्वारंटाइन अनिवार्य केले आहे.

14 मेरोजी सुमारे 12 लाख लोक होते क्वारंटाइन
एका अधिकृत अंदाजानुसार 26 मे रोजी एकुण 22.81 लाख लोक विविध राज्य आणि केंद्र शासीत प्रदेशांद्वारे क्वारंटाइन होते. 12 दिवसापूर्वी म्हणजेच 14 मे रोजीच्या तुलनते ही संख्या सुमारे दुप्पट होती, जेव्हा 11.9 लाख लोक क्वारंटाइनमध्ये होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त 6.02 लाख लोक क्वारंटाइन केले आहेत. यांनतर गुजरातचा नंबर येतो. येथे एकुण 4.42 लाख लोकांना क्वारंटाइन सेंटर्समध्ये क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. 14 मेरोजी महाराष्ट्रात 2.9 लाख आणि गुजरातमध्ये 2 लाख लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवले गेले होते.

सरकारच्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान बुधवारपर्यंत देशभरातील विविध ठिकाणांहून एकुण 91 लाख प्रवासी मजूरांना ट्रेन आणि बसद्वारे विविध राज्यात पाठवण्यात आले. वंदे भारत मिशन अंतर्गत, आतापर्यंत सुमारे 40 देशांमधून जवळपास 30,000 भारतीय नागरीकांना सरकारद्वारे परत आणले गेले आहे. सरकारची योजना 60 देशांमधून एक लाख भारतीयांना परत आणण्याची आहे.

सध्या क्वारंटाइन सुविधेमध्ये ते लोक आहेत जे रेल्वे, बस किंवा विशेष अंतरराष्ट्रीय उड्डाणांनी विविध राज्यांमध्ये पोहचले आहेत. उत्तर प्रदेश, जेथे सर्वात जास्त प्रवासी मजूर पोहचले आहेत, तेथे 3.6 लाख लोक क्वारंटाइन केले गेले आहेत. यामधील बहुतांश लोक आपल्या घरांमधून क्वारंटाइन आहेत. बिहारमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने मजूर पोहचले आहेत. तेथे 2.1 लाख लोक क्वारंटाइन सेंटर्समध्ये आहेत. 14 मे रोजी उत्तर प्रदेशात 2.3 लाख आणि बिहारमध्ये 1.1 लाख लोक क्वारंटाइन होते.