भाजपाने COVID-19 च्या मदतीबाबत जाहीर केला अहवाल, लोकांमध्ये 19 कोटीहून अधिक फूड पॅकेटचे केले वितरण

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : कोविड -19 च्या विरोधात सुरू असलेल्या देशव्यापी संघर्षातील योगदानासंदर्भात भाजपाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. पक्षाने देशभरातील गरजू लोकांमध्ये 19.28 कोटी फूड पॅकेटचे वितरण केले. पक्षाच्या अधिकृत आकडेवारीनुसार पाच कोटी लोकांना फूड पॅकेट्स देण्याचे लक्ष्य होते. त्या तुलनेत पक्षाने 19.28 कोटी पाकिटे वाटली. तसेच आकडेवारीत सांगण्यात आले होते की पाच कोटी मास्क वितरित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्याऐवजी पक्षाने 5.2 कोटी मास्क वाटले.

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या सूचना

त्याशिवाय भाजपाने सुमारे 4.86 कोटी रेशन किटचे वितरण केले आहे. मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना पाच कोटी गरजूंना खाद्यान्न पाकिटे देण्याचे निर्देश दिले. कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनने बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी देशभरात किमान 8.23 लाख कार्यकर्ते एकत्रित झाले आहेत.

भारतात अद्याप कोरोनाचे संकट कमी झाले नाही

भारतात अद्याप कोरोनाचे संकट कमी झाले नाही. दिवसेंदिवस देशात कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. देशाची राजधानी दिल्लीसह बरीच राज्ये अशी आहेत जिथे कोरोनाची अनेक प्रकरणे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत एक लाख 38 हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत आणि 4 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 1,38,845 प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याच वेळी, देशात मृतांचा आकडा 4021 पर्यंत वाढला आहे. सध्या 77,103 सक्रिय प्रकरणे आहेत. दरम्यान, ही भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे की आतापर्यंत देशातील 57,721 (41.57%) रुग्ण कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त झाले आहेत.