बिल्डर खंडणी प्रकरणात गँगस्टर रवी पुजारीवर आरोपपत्र दाखल

बेंगलुरू : वृत्तसंस्था –   बेंगळुरूच्या टिळक नगरमध्ये शबनम डेव्हलपर्स शूटआऊट आणि शहरातील व्हाईटफील्डमधील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी घेतल्या प्रकरणात आरोपी असलेल्या गँगस्टर रवी पुजारी याच्याविरुद्ध बेंगळुरू पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. बेंगळुरूचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी ही माहिती दिली. सेनेगल येथून प्रत्यार्पणानंतर रवी पुजारी सध्या बेंगळुरू पोलिसांच्या ताब्यात आहे.

संदीप पाटील यांनी सांगितले की, दोषारोपपत्र दोन प्रकरणांशी संबंधित आहे. ही प्रकरणे बेंगळुरूच्या टिळक नगरमधील शबनम डेव्हलपर्सच्या कार्यालयात झालेला गोळीबार आणि शहरातील व्हाईटफील्डमधील बिल्डर कडून खंडणी घेतल्या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, टिळक नगरमधील पुजारीचा साथीदार शबनम डेव्हलपर्सच्या कार्यालयात गेला आणि त्या ठिकाणी रिसेप्शनिस्ट शैलजा आणि कार्यालयीन सहाय्यक रवी यांचा गोळ्या घालून खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली होती. हे हत्याकांड घडवण्यासाठी पुजारीने हत्यारे पुरवली होती. व्हाईटफील्ड प्रकरणात बिल्डरला खंडणीच्या पैशांसाठी धमकावण्यात आले होते. पुजारी विरुद्ध कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले आहेत. संदीप पाटील यांनी सांगितले की, पुजारीचा बऱ्याच प्रकरणांमध्ये हस्तक्षेप आहे. आम्ही एक एक करून आरोपपत्र दाखल करीत आहोत.

व्हाईटफील्ड प्रकरणात बिल्डरला पैशांसाठी धमकी देण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पुजारी अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आहे. पोलीस एक एक करून आरोपपत्र दाखल करीत आहे. सध्या दोन प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तब्बल 15 वर्षे फरार असलेल्या गँगस्टर रवी पुजारीला दक्षिण अफ्रिकेत अटक करण्यात आली. यानंतर त्याला सेनेगल येथे प्रत्यार्पण करण्यात आले. गेल्या 23 फेब्रुवारीला त्याला बेंगळुरू येथे आणण्यात आले आहे.