Kangana Ranaut : केंद्रीय गृहमंत्रालयानं कंगना राणावतला दिली Y श्रेणीची सुरक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांना वाय श्रेणी सुरक्षा मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्रालयाने कंगनाला वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. वास्तविक, कंगना रणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध तीव्र झाले होते. संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला. यावर कंगनाने मुंबईत येण्याचे चॅलेंज केले होते.

आता केंद्रीय गृह मंत्रालयाने कंगना राणावत यांना वाय श्रेणी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सुरक्षेत 11 सैनिक तैनात असतील. यात एक-दोन कमांडो आणि उर्वरित पोलीस कर्मचारी असतील. असे सांगितले जात आहे की 9 सप्टेंबर रोजी कंगना मुंबईला पोहोचेल तेव्हा त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात येईल.

वास्तविक बहुचर्चित सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या बाबतीत कंगना रणौतने सुरवातीपासूनच आपला आवाज उंचावला आहे. त्यांनी बॉलिवूड माफिया, नेपोटीझम आणि आता ड्रग्जच्या मुद्द्यावर उघडपणे आपले मत मांडले आहे.