Coronavirus Vaccine Update : संपूर्ण जगात जवळपास 150 वॅक्सीनवर काम सुरू,स्पर्धेत ‘या’ 4 लस सर्वात पुढं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचा प्रकोप जारी आहे. मागील 7 महिन्यात 1 कोटी 64 लाखपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. यादरमयान 6 लाख 50 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वॅक्सीनच्या कामाकडे लागले आहे. जगभरात जवळपास 150 वॅक्सीनवर काम सुरू आहे. यापैकी निम्म्या सुरूवातीच्या टप्प्यात आहेत. तर चार वॅक्सीन अशा आहेत, ज्या रेसमध्ये सर्वात पुढे आहेत. यामध्ये मॉडर्ना, ऑक्सफर्ड, फायजर, भारत बायोटेक यांचा समावेश आहे. जाणून घेवूयात या वॅक्सीन केव्हापर्यंत तयार होऊ शकतात.

1 मॉडर्ना
ही अमेरिकन वॅक्सीन फेज-3 च्या ट्रायलमध्ये आहे आणि तिची सर्वात मोठी ट्रायल होत आहे. या दरम्यान 30 हजार लोकांवर वॅक्सीनचा परिणाम होईल. वॅक्सीनबाबत अमेरिकेचे म्हणणे आहे की, यावर्षाच्या अखेरीस ती तयार होईल. कंपनीला अमेरिकन सरकारने एक बिलियन डॉलर (सात हजार कोटी रुपये) ची मदत केली आहे.

2 ऑक्सफर्ड
ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, एस्ट्राजेनेकासह मिळून वॅक्सीन बनवत आहे. वॅक्सीनची पहिली आणि दुसरी ट्रायल पूर्ण झाली आहे. ब्राझील आणि दक्षिण अफ्रीकेत तिसर्‍या फेजची ट्रायल सुरू झाली आहे. भारताच्या सीरम कंपनीने वॅक्सीनच्या प्रॉडक्शनसाठी करार केला आहे. कंपनीनुसार ते ऑगस्टच्या अखेरीस भारतात याची तिसरी ट्रायल करत आहेत. यामध्ये सुमारे 4 ते 5 हजार लोकांवर वॅक्सीनचे परिक्षण करण्यात येईल. अपेक्षा आहे की, याची किंमत एक हजार रुपये प्रति लस असेल. सर्व काही ठिक झाले तर वॅक्सीनचा इमर्जन्सी डोस ऑक्टोबरपर्यंत तयार होऊ शकतो.

3 फायजर
फायजर सुद्धा अमेरिकन वॅक्सीन आहे. वॅक्सीन पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात यशस्वी ठरली आहे. आता फायनल स्टेजकडे जात आहे. अमेरिकेने कंपनीसोबत डिसेंबरमध्ये याचे 10 कोटी डोस सप्लाय करण्यासाठी सुमारे दोन अरब डॉलर (15 हजार कोटी रुपये) चा सौदा केला आहे. कंपनीचा दावा आहे की, या वर्षीच्या अखेरपर्यंत वॅक्सीन तयार होईल.

4 भारत बायोटेक
भारताची पहिली स्वदेशी कोरोना वॅक्सीन कोवाक्सिनची सध्या विविध राज्यांमध्ये ह्यूमन ट्रायल सुरू आहे. ही भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद सोबत मिळून बनवली आहे. पुढील वर्षाच्या सुरूवातीला ती लाँच होऊ शकते.

किती असेल किंमत
यादरम्यान जागतिक समुदायाची नजर सर्व वॅक्सीन तयार झाल्यानंतर जगभरात ती पुरवण्याची प्रक्रिया आणि किंमत याकडे असणार आहे. रायटर्सनुसार कोरोना व्हायरस वॅक्सीन तयार करत असलेल्या ग्लोबल वॅक्सीन अलायन्सचे म्हणणे आहे की, या वॅक्सीनची किंमत कमाल 40 डॉलर (3000 रुपये) पर्यंत असू शकते.