‘या’ प्राण्यामुळे पसरू शकतो ‘कोरोना’ व्हायरस, जाणून घ्या WHO चं मत

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –    जगभरात ८० हजारांहून अधिक लोकांचा बळी गेलेल्या कोरोना विषाणूबद्दल आता नवीन बाब समोर आली आहे. जगभरात वेगाने पसरणार्‍या कोरोना विषाणूबाबत बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार डब्ल्यूएचओने सूचित केले की, मांजरींना कोरोना विषाणूची लागण होऊ शकते, परंतु कुत्री त्यापासून सुरक्षित आहेत. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामध्ये ही बाब समोर आली आहे. डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यामध्ये व्हायरसच्या संप्रेषणाचे बारकाईने निरीक्षण करेल. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी सांगितले की, ते आरोग्य संकटात पाळीव प्राण्यांच्या भूमिकेकडे अधिक लक्षपूर्वक पाहण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह एकत्र काम करत आहेत.

सायन्स जर्नलच्या वेबसाइटवर प्रकाशित अभ्यासात असे आढळले आहे की, कोविड-१९ आजाराचे कारण बनणाऱ्या व्हायरसची वैज्ञानिक संज्ञा SARS-CoV-2 ने फेरेट्स देखील संक्रमित होऊ शकतात. संशोधकांना असे आढळले कि कुत्री, कोंबड्या, डुक्कर आणि बदकांपासून व्हायरसने संक्रमित होण्याची शक्यता नाहीये.

अभ्यासाचा उद्देश हे जाणण्यासाठी होता की, कोणत्या प्राण्यांना हा व्हायरस होऊ शकतो, यासाठी त्यांना कोविड-१९ शी लढण्यासाठी प्रयोगात्मक लसींच्या परीक्षणासाठी वापरले जाऊ शकते. मानले जाते कि SARS-CoV-2 वटवाघुळापासून माणसात पसरला आहे. मांजर आणि कुत्र्यांमध्ये काही सूचित संक्रमणे वगळता, याचे वाहक पाळीव प्राणी असू शकतात याचा ठोस पुरावा मिळालेला नाही.

न्यूयॉर्क शहरातील ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयात वाघाला कोरडा खोकला आणि भूक न लागणे यासारखी लक्षणे दिसू लागली. रविवारी कोरोना विषाणूची त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. चीनमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या संशोधनाच्या आधारे, संशोधकांना मांजरींना विषाणूची लागण होण्याची शक्यता असल्याचे आढळले. त्यांना आढळले कि मांजरी श्वासोच्छवासाच्या थेंबाद्वारे एकमेकांना संक्रमित करू शकतात. संक्रमित मांजरींच्या तोंडात, नाकात आणि लहान आतड्यात विषाणू होता. विषाणूच्या संपर्कात असलेल्या मांजरीच्या पिल्लांच्या फुफ्फुस, नाक आणि घशात मोठ्या प्रमाणात जखम होती.