संरक्षण मंत्रालयानं कोट्यवधी रुपयांच्या करारावर केली ‘स्वाक्षरी’, नवीन तंत्रज्ञानामूळे आणखी ‘पावरफुल’ होईल ‘भीष्म’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात शांतता चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, भारत आपले सैन्य सामर्थ्य आणखी मजबूत करण्यात गुंतले आहे. देशाच्या रक्षणासाठी भारताने लडाखवर टी-90 टँक (यास भीष्म असेही म्हणतात) तैनात केले आहेत. या टॅंकला आणखी मजबूत करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक करार केला आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार संरक्षण मंत्रालयाने 557 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्याअंतर्गत भारताला 1512 ‘माइन प्लाउ’ मिळतील, ज्यास नंतर टी-90 टॅंक (भीष्म) वर बसवण्यात येईल. या नव्या कराराअंतर्गत टी-90 एस/ एसकेसाठी 1,512 माइन प्लाउ भारत अर्थ मूव्हर्सकडून खरेदी केले जातील. कराराच्या अनुसार 50 टक्के स्वदेशी सामग्री खरेदी केली जाईल आणि तयार केली जाईल.

टी-90 टँकच्या वर ‘माइन प्लाउ’ ला लावण्यात येईल. जेणेकरून शत्रूंनी कोणत्याही भागात माइंस पसरवल्या असतील तर त्यास टॅंकवर राहूनच खोदून बाहेर काढले जाईल. टॅन्कमध्ये ‘माइन प्लाउ’ बसविल्यानंतर सीमेवरचे जवान कोणत्याही माइंसचे शिकार न होता स्वत:चे रक्षण करत विरोधकांना सामोरे जातील. मिळालेल्या माहितीनुसार या कराराअंतर्गत मिळणारे सर्व ‘माइन प्लाउ’ भारतात पोहोचण्याची प्रक्रिया 2027 पर्यंत पूर्ण होईल. असा विश्वास आहे की येत्या एक-दोन वर्षांत त्यांच्या येण्याची सुरुवात होईल.

भीष्मला जगातील सर्वात परिपूर्ण टॅंकपैकी एक मानले जाते. चीनने एलएसी ओलांडून त्यांच्या मुख्य तळावर चिलखती वाहने असलेली टी-95 टॅंक तैनात केली आहेत, परंतु त्या भीष्मपेक्षा वरचढ नाहीत. सुरुवातीला टी -90 टॅंक सुरुवातीला रशियाहूनच तयार होऊन आल्या होत्या. नंतर त्यांचा प्रगत फॉर्म तयार केला गेला.

ही आहेत भीष्म ची वैशिष्ट्ये

एका मिनिटात आठ गोळे डागण्यास सक्षम असलेली ही टॅंक जैविक व रासायनिक शस्त्रास्त्रांचा सामना करू शकते.

याचे आर्म्ड प्रोटेक्शन हे जगातील सर्वोत्तम मानले जाते, जे क्षेपणास्त्र हल्ल्यापासून बचाव करू शकते.

एक हजार अश्वशक्तीच्या इंजिनची क्षमता असलेली ही टँक दिवस रात्र लढू शकते.

सहा किमी अंतरापर्यंत क्षेपणास्त्रही प्रक्षेपित करू शकते.

जगातील सर्वात हलकी टँक म्हणून ओळख आहे, वजन फक्त 48 टन.

हे 72 किलोमीटर वेगाने धावू शकते.

दमचोक आणि चुशुलच्या वालुकामय आणि सपाट मैदानावर वेगाने धावण्यास सक्षम.