सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ED नं दाखल केला गुन्हा ! ‘मनी लाँड्रींग’ संबंधात होणार चौकशी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलं आहे. या प्रकरणी आता ईडीनं मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल केला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबधित पैशांचे जे काही व्यवहार झाले आहेत त्या प्रकरणी आता ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. बिहार पोलिसांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर या आधारावर आता मनी लाँड्रींगची केस दाखल करण्यात आली आहे.

ईडीनं गुरुवारीच या प्रकरणातील एफआयआर आणि इतर कागदपत्रांची बिहार पोलिसांकडे मागणी केली आहे. रिया चक्रवर्ती कुटुंबाच्या दोन्ही कंपन्यांच्या बँक खात्यांची माहिती, तसेच सुशांतच्या बँक खात्यांची माहितीही ईडीनं मागवली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता ईडीनं हस्तक्षेप केल्यानंतर मात्र या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला आहे. सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये असा आरोप केला आहे की, रिया चक्रवर्तीनं पैशांची मोठी अफरातफर केली आहे. त्याला कुटुंबापासून दूर करायचं आणि वेड ठरवून त्याचे पैसे लुटण्याचा रियाचा डाव असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.