दिल्ली दंगलीच्या मागे विदेशी ‘हात’, ‘या’ मुस्लिम देशातील NGO नं दिले होते पैसे – रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या महिन्यात उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसाचारानंतर हळूहळू गोष्टी चर्चेत येत आहेत. माहितीनुसार, इंडोनेशियातील एका स्वयंसेवी संस्थेने ही दंगल भडकवण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. या एनजीओने दंगलींसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि इंटरनेटवरही दंगलीबद्दल प्रचार प्रसार केला. धक्कादायक बाब म्हणजे या एनजीओनेही मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला देखील पैशातून मदत केली.

दंगलीसाठी फंडिंग करण्याची ट्रस्टींची तयारी :

मिळालेल्या माहितीनुसार, एनजीओच्या ट्रस्टींना दंगल पसरवण्यासाठी लोकांना पैसे द्यायचे होते. या एनजीओचे धोकादायक हेतू यावरून उघडकीस आले की, बांगलादेशातील दंगलींनाही या स्वयंसेवी संस्थेने वित्तपुरवठा केला होता. गेल्या महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, सध्या राजधानीमध्ये कायदा व सुव्यवस्था सामान्य आहे. तसेच हिंसाचाराच्या प्रकरणात 712 एफआयआर नोंदविले गेले असून 200 हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सॉफ्टवेअरच्या मदतीने दंगल खोरांची ओळख :

दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एमएस रंधावा म्हणाले की, दंगलीत सामील झालेल्या लोकांना चेहरा ओळखण्याच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने ओळखले गेले आहे आणि घटनेचा सर्व कोनातून तपास करण्यात येत आहे. ते म्हणाले, “दिल्लीमध्ये आता कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सामान्य आहे. ईशान्य दिल्लीकडून येणार्‍या पीसीआर कॉलवर आम्ही बारकाईने नजर ठेवत आहोत. तसेच उत्तर-पूर्व दिल्ली दंगलीप्रकरणी 712 एफआयआर नोंदविण्यात आले असून 200 हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.