ISRO Mars Mission : मंगळयानानं पाठवलं मंगळ ग्रहाच्या सर्वात मोठ्या चंद्राचं छायाचित्र, जाणून घ्या काय त्यामध्ये ‘खास’

बेंगळुरू : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) मंगळयान म्हणजे मार्स ऑर्बिटर मिशनने मंगळ ग्रहाच्या जवळच्या आणि सर्वात मोठा चंद्र फोबोसचे छायाचित्र पाठवले आहे. एमओएमवर लावलेल्या मार्स कलर कॅमर्‍याने हे छायाचित्र टिपले आहे. एमसीसीने हे छायाचित्र 1 जुलैला त्यावेळेस टिपले होते, जेव्हा एमओएम मंगळ ग्रहापासून 7,200 किलोमीटर आणि फोबोसपासनू 4,200 किलोमीटर दूर होते.

फोबोसच्या फोटोसह जारी केलेल्या वक्तव्यात इस्त्रोने म्हटले आहे की, हा फोटो 6 एमसीसी फ्रेसने घेतला गेला आहे. हे एक समग्र छायाचित्र आहे आणि त्याचे कलर ठिक करण्यात आले आहेत. इस्त्रोनुसार, फोबोसवर एक खुप मोठा खड्डा दिसत आहे, ज्यास स्टिकनी नाव देण्यात आले आहे. तो फोबोसवर आकाश उल्काष्म धडकल्याने तयार झाला होता. याशिवाय सुद्धा अनेक छोटे-छोटे खड्डे या फोटोत दिसत आहेत. यांची नावे स्लोवास्की, रोश आणि ग्रिलड्रिग ठेवण्यात आली आहेत.

इस्त्रोने 24 सप्टेंबर 2014 ला मार्स ऑर्बिटर मिशन अंतर्गत मंगळयान यशस्वीपणे अंतराळात मंगळाच्या कक्षेत स्थापित केले होते. या मिशनचा उद्देश सुरूवातीस सहा महिन्यांसाठी होता, परंतु नंतर इस्त्रोने म्हटले की, अनेक वर्ष सेवा देण्यासाठी यामध्ये आवश्यक तेवढे इंधन आहे. इस्त्रोने मंगळयान आपल्या पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत स्थापित केले होते.

यासोबतच भारत मंगळाच्या कक्षेत पोहचणार्‍या एलिट समूहात सहभागी झाला होता. इस्त्रोने 5 नोव्हेंबर 2013ला आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटामधून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण केले होते. यामध्ये 450 कोटी रूपयांचा खर्च आला होता. मिशनचा उद्देश मंगळाचा पृष्ठभाग आणि तेथील खनिजांची संरचना यांचा अभ्यास करणे आहे. त्याच बरोबर हा देखील उद्देश आहे की, तेथील वायुमंडळात मिथेनच्या अस्तित्वाबाबत पडताळणी करणे. मंगळावर मिथेनचे असणे जीवनाकडे संकेत करते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like