Coronavirus : लता मंगेशकर, शाहरूख व माधुरीनं केले PM मोदींच्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाचं ‘समर्थन’

पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्य रविवारच्या जनता कर्फ्युच्या आवाहन अजूनही समर्थन सुरूच आहे. दिग्गज गायिका लता मंगेशकर, अभिनेता शाहरुख खान, कमल हासन, माधुरी दीक्षित, यांनी साऱ्यांनी मोदींच्या आवाहनाला समर्थन केलं आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ते लोकांना आवाहन करत आहेत.

‘मी मोदी आणि ठाकरेंनाच्या आवाहनचा समर्थन करते’

गायिका लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपीलसोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पूर्णबंदीचं समर्थन केलं आहे. लता मंगेशकर यांनी ट्विट करत म्हटलं की, “मी पीएम मोदी आणि सीएम ठाकरेंच्या अपीलचं समर्थन करते. लोकांनाही माझं अपील आहे की, त्यांनी देखील या अपीलचं समर्थन करावं आणि महामारीपासून मुक्ती मिळवण्यास मदत करावी.”

शाहरुख खाननंही ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं की, “लोकांच्या भेटीगाठी घेणं बंद करा. स्वत:ला क्वारंटाईन करा. सुरक्षित आणि निरोगी रहा.” याशिवाय किंग खाननं एक व्हिडीओदेखील शेअर केला होता.

कमल हासन यांनीही ट्विट करत सांगितलं की, मोदींच्या सोबत आहे. त्यांनी म्हटलं की, “मी मोदींच्या सोबत आहे. या स्थितीत अनेक उपाययोजना केल्या जाणं गरजेचं आहे. याशिवाय इतरही अनेक बॉलिवूड स्टार आहेत त्यांनी ट्विट करत मोदींच्या निर्णयाला सपोर्ट केला आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांचे ट्विट आणि काही इंस्टा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

https://twitter.com/karanjohar/status/1240683140873465859