‘मन की बात’ साठी PM मोदींनी मागितल्या ‘आयडिया’, म्हणाले – ‘आपल्याजवळ बोलण्यासाठी खूप काही असेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात 28 जून रोजी पुन्हा एकदा ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशातील जनतेला संबोधित करतील. दरम्यान, त्यांनी या कार्यक्रमासाठी देशवासियांकडून सूचना आणि कल्पना मागितल्या आहेत. आपण देखील या कार्यक्रमासाठी आपले विचार आणि सूचना सामायिक करू शकता, त्यापैकी पंतप्रधान मोदी त्यांच्या कार्यक्रमात निवडक विषयांचा समावेश करतील.

पंतप्रधानांनी स्वतः ट्वीट करून देशवासीयांकडून त्यांचे मत मागितले आहे. मोदींनी ट्वीट करत लिहिले की, कोरोना संघर्षाबद्दल देशवासीय आपली मते माझ्याशी शेअर करू शकतात. पंतप्रधानांनी देशवासीयांना त्यांचे संदेश रेकॉर्ड करण्यासाठी एक नंबर दिला आहे. आपण 1800-11-7800 वर कॉल करून आपले संदेश रेकॉर्ड करू शकता. ही फोन लाइन 24 जूनपर्यंत खुली राहील. तसेच, आपण नमो अ‍ॅप किंवा मायगोव्हवरही आपली मते लिहू शकतात. त्याचप्रमाणे आपण narendramodi.in वर जाऊन आपले विचार आणि सूचना सामायिक करू शकता. दरम्यान, दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदी रेडिओच्या माध्यमातून नागरिकांशी मन कि बात करतात, ज्याचे आकाशवाणीवरून प्रसारण केले जाते आणि बर्‍याच वृत्तवाहिन्यां त्याचे थेट प्रक्षेपणही करतात.

31 मे रोजी आपल्या शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी लोकांना कोरोना विषाणूच्या साथीच्या विरोधात आपली सुरक्षा कमी न करण्याची आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करत, मास्क घालण्याचा आणि हात स्वच्छ धुण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांचा संदेश अशा वेळी आला, जेव्हा सरकारने 25 मार्चपासून लागू करण्यात आलेला लॉकडाउन टप्याटप्याने संपविण्याची घोषणा केली.

कोरोना विषाणूच्या साथीच्या विरुध्द भारताच्या लढाईचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, आपली विविध आव्हाने व लोकसंख्येसोबत देश संक्रमणास पसरण्यापासून रोखण्यात सक्षम ठरला आहे आणि साथीच्या आजाराने होणाऱ्या मृत्यूची संख्या तुलनेने कमी आहे. पंतप्रधान म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला साथीच्या आजाराचा त्रास झाला आहे, परंतु गरिबांना होणारी वेदना शब्दात मोजता येत नाही.