भारतीय सैन्याचे चोख ‘प्रत्युत्तर’ ! ‘1 के बदले 7’ PAK चे 2 अधिकारी आणि 5 जवान ठार, 3 चौक्या ‘नेस्तनाभूत’

राजौरी : वृत्तसंस्था – भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर जगात एकाकी पडलेले पाकिस्तान सरकार आणि सैन्याचा मोठा जळफळाट होत आहे. अशातच शनिवारी सकाळी पाक सैन्याने जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यातील नौसेरा तहसीलच्या कलाल सेक्टर आणि पूंछच्या मानकोट सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार केला.

यामध्ये नौसेरा क्षेत्रातील भारतीय सैन्याचे एक लान्स नायक शहीद झाले. पण यानंतर भारताने पलटवार करून पाक सैन्याच्या तीन चौक्या नष्ट केल्या आहेत. या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे दोन अधिकारी आणि पाच सैनिक ठार झाल्याचेही वृत्त आहे. असे असूनही, नियंत्रण रेषेकडे उशिरा सायंकाळपर्यंत गोळीबार सुरू होता. यामुळे सीमेवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. भारतीय सैन्य दलाचे शहीद लान्स नाईक, यांचे नाव वर्षांचे संदीप थापा असून वय २५ आहे.

पाक कडून मोर्टारने निवासी भागातही गोळीबार :
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी पाकिस्तान सैन्याने अचानक नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला. पाक सैन्याने लष्करी चौक्यांना लक्ष्य करून निवासी भागात मोर्टारच्या साहाय्याने गोळीबार सुरू केला. या दरम्यान सीमेवर तैनात केलेल्या भारतीय लष्कराचे लान्स नाईक संदीप थापा गंभीर जखमी झाले. त्यावेळी तेथे उपस्थित इतर सैनिकांनी जखमी लान्स नायकला जवळच्या लष्करी रुग्णालयात नेले. जेथे उपचारादरम्यान ते शहीद झाले.

भारतीय सैन्याचे जोरदार प्रत्युत्तर :
यानंतर भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर सुरू केले. यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या तीन चौक्या पूर्णपणे नष्ट झाल्या, तर पाक लष्कराच्या एकूण सहा ते सात जवानांच्या मृत्यूची नोंद आहे. यामध्ये पाक लष्कराचे दोन अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी पाक सैन्याने पुंचच्या मानकोट सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. या क्षेत्रातही भारतीय लष्कराकडून पाकिस्तान लष्कराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

स्वातंत्र्य दिनीही केला होता गोळीबार :
१५ ऑगस्ट रोजी देखील पाक सैन्याने पुंछच्या कृष्णा खोरे सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार केला. यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या जवाबी कारवाईत पाकचे चार जवान ठार झाले होते. तर अनेक बंकर देखील नष्ट झाले. सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाक सैन्य वारंवार युद्धबंदीचे उल्लंघन करीत आहे.

पाकचा सूर बदलला :
चीनचा दबाव असूनही युएन कौन्सिलमधील पाकिस्तानच्या प्रयत्नांकडे जगणे दुर्लक्ष केले.संयुक्त राष्ट्राकडून निराश झाल्यानंतर मात्र पाकिस्तानची भाषा बदलली आहे. पत्रकार परिषदेत पाकिस्तानला ‘काश्मीर प्रश्नावर भारताशी चर्चा करण्यास इच्छुक आहे का ?’ असे विचारले असता कुरेशी म्हणाले की काश्मीर प्रश्नावर शांततेने तोडगा काढण्यासाठी पाकिस्तान तयार आहे. मात्र त्यासाठी आधी काश्मीरमधील कर्फ्यू संपला पाहिजे तरच चर्चा शक्य होईल.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like