‘कोरोना’ वॅक्सीनच्या तयारीचा उद्या आढावा घेणार PM मोदी, उद्या करणार पुणे-अहमदाबाद आणि हैद्राबादचा दौरा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशात कोरोना महामारीचे संकट वेगाने वाढत आहे. अशावेळी कोरोना वॅक्सीनकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशात कोरोना वॅक्सीनच्या तयारीचा आढावा घेतील. यासाठी ते शनिवारी देशात कोरोना वॅक्सीनची तीन मोठी केंद्र – पुणे, हैद्राबाद आणि अहमदाबादचा दौरा करतील. माहितीनुसार, उद्या म्हणजे 28 नोव्हेंबरला पीएम मोदी पुणेयेथील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चा दौरा करतील. येथे ऑक्सफोर्डची कोरोना वॅक्सीन कोविशील्डची ट्रायल घेतली जात आहे.

याशिवाय पीएम मोदी अहमदाबादमध्ये भारताची स्वदेशी कोरोना वॅक्सीन झायकोव्ह-डी (ZyCoV-D) ची ट्रायल करत असलेली कंपनी झायडस कॅडिला (Zydus Cadila) च्या केंद्राचा सुद्धा दौरा करतील. एका माहितीनुसार पीएम मोदी हैद्राबादला सुद्धा जाऊ शकतात, जिथे भारत बायोटेक (Bharat Biotech) चे ऑफिस आहे. भारत बायोटेक इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) सोबत मिळून स्वदेशी कोरोना वॅक्सीन कोवॅक्सीन (Covaxine) तयार करत आहे.

देशात कुठपर्यंत पोहचली कोरोना वॅक्सीन

देशात सध्या तीन वॅक्सीनवर काम सुरू आहे. यामध्ये ऑक्सफोर्ड वॅक्सीन, भारत बायोटेकची वॅक्सीन आणि झायडस कॅडिलाच्या वॅक्सीनचा समावेश आहे. या तिनही वॅक्सीन ट्रायलच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. देशात सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाची ऑक्सफोर्ड वॅक्सीन, कोविशील्ड रेसमध्ये सर्वात पुढे आहे. सीरम इन्स्टीट्यूटची योजना ही आहे की, ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड वॅक्सीनला आत्कालीन मंजूरी मिळताच भारतात ते तिच्या इमर्जन्सी अ‍ॅप्रूव्हलसाठी अप्लाय करतील.

पीएम मोदी उद्या अहमदाबादला सुद्धा जाणार आहेत. अहमदाबादमध्ये झायडस कॅडिलाचे केंद्र आहे, ज्यांनी झायकोव्ह-डी कोरोना वॅक्सीन बनवले आहे. ही वॅक्सीन आपल्या दुसर्‍या टप्प्यातील ट्रायलमध्ये आहे. याशिवाय पीएम मोदी हैद्राबादमध्ये भारत बायोटेकच्या वॅक्सीन केंद्रावर सुद्धा जातील. भारत बॉयोटेकच्या कोवॅक्सीनची ट्रायल सध्या तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात आहे.