National Short Film Festival | 14 व्या ‘प्रतिबिंब’ राष्ट्रीय लघुपट महोत्सवात लोडिंग पिक्चर्स निर्मित ‘डे झीरो’ ठरला प्रथम

पोलीसनामा ऑनलाईन टीम – 14 व्या “प्रतिबिंब” राष्ट्रीय लघुपट (National Short Film Festival) आणि माहितीपट महोत्सवात लोडिंग पिक्चर्स निर्मित शुभम पांडव (Shubham Pandav) दिग्दर्शित “डे झीरो” (Day Zero) लघुपटाने विध्यार्थी विभागातून तब्बल चार पारितोषिक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. “डे झीरो” ह्या लघुपटास (National Short Film Festival) उत्कृष्ट लघुपट म्हणून घोषित करण्यात आले आहे.

 

‘डे झीरो’  लघुपटाचे दिग्दर्शन आणि लेखण शुभम पांडव (Shubham Pandav) यांनी केले आहे.

 

उत्कृष्ट लघुपट : डे झीरो (Day zero)

उत्कष्ट दिग्दर्शक : शुभम पांडव (Shubham pandav)

उत्कृष्ट छायाचित्रकार: चिन्मय बाविस्कर (Chinmay Baviskar)

उत्कृष्ट संकलन : अजिंक्य कुलकर्णी (Ajinkya Kulkarni) ऐकून चार पारितोषिक या लघुपटाला मिळाले आहेत.

 

“प्रतिबिंब” राष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे परीक्षण उपेंद्र सिधये, मनुज कदम ह्या मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांनी केले आहे. ‘डे झीरो’ लघुपटाचे कथानक भविष्यात येऊ घातलेल्या पाणी संकटाची तीव्रता किती भयानक असू शकते ह्याचा आलेख आपल्यासमोर मांडते. वीस मिनिट कोणत्याही संवादा शिवाय ‘डे झीरो’ लघुपट आपल्या मनावर ताबा मिळवण्यात यशस्वी होतो. विद्यार्थी दशेत तयार केलेला हा लघुपट पुर्ण करण्यास ‘पर्यावरण हिताय वनराई’ संस्था तसेच सुधीर पवार यांनी लघुपट सह-निर्मितीस साह्य केले.

‘डे झीरो’ (National Short Film Festival) चे निर्माते अमेय गोसावी ह्यांनी लोडिंग पिक्चर्स च्या माध्यमातून अजूनही काही दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे सांगितले त्यात प्रामुख्याने ओंकार बर्वे दिग्दर्शित ‘दीड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

फक्त जागतिक जलदिनाच्या दिवशी पाणी टंचाईबाबत हळहळ व्यक्त केल्याने पाणी प्रश्न सुटणार नाही.
त्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. पाण्याच्या तळाचा शोध घेण्याचा प्रवास डे झीरो या लघुपटातुन दाखवलाय.

 

Web Title :- National Short Film Festival | Loading Pictures’ Day Zero becomes first at 14th ‘Reflection’ National Short Film Festival

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Vs BJP | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची भाजपवर सडकून टीका, म्हणाले – ‘तुमचे हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच’

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्याच्या मुळशीत गांजाची शेती; पुणे पोलिसांकडून चौघांवर मोठी कारवाई, 18 किलो गांजा जप्त

Mumbai Hyderabad Bullet Train | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

Pune News | पुण्यामधील पाटील इस्टेट येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पुढील 4 वर्षांमध्ये पुर्ण करणार; सोमवारपासून सर्वेक्षण सुरु होणार

Pune Crime | न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार; फोटो डिलिट करण्यासाठी मागितली 1.70 लाख रुपयांची खंडणी