‘सर्व भारतीयांनी आपल्या खिशातून लढायला हवी चीनविरूध्दची लढाई’, रोमन मॅगसेस विजेता सोनम वांगचूक यांनी सांगितलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखमध्ये भारत-चीन सैन्यात झालेल्या चकमकी दरम्यान रोमन मॅगसेस पुरस्कार विजेता सोनम वांगचुक यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला आहे. ते म्हणाले की, प्रत्येक भारतीय हा चीनविरूद्धच्या युद्धामध्ये एक सैनिक आहे आणि प्रत्येकाने आपल्या व्हॉलेटसह चीनविरुद्ध लढाई लढायची आहे. रविवारी प्रसिद्ध झालेल्या दुसर्‍या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आपले चिनी लोकांशी काही वैर नाही. आपण तिथल्या विस्तारवादी आणि शोषण व्यवस्थेला विरोध करत आहोत. ११ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

सोनम वांगचुक यांच्या चीन-निर्मित वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेचे योगगुरू बाबा रामदेव यांनीही समर्थन केले आहे. बाबा रामदेव यांनी ट्विट करत म्हटले की, त्यांचे चीन किंवा तिथल्या लोकांशी कोणतेही वैर नाही. परंतु देशाविरूद्ध चीनचे षडयंत्र रोखण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकणे आवश्यक आहे.

तिबेटी आणि उइगर मुसलमानांबाबत जगात शांतता
ते म्हणाले की, कोणी एक व्यक्ती ही चळवळ चालवू शकत नाही. या लढ्यात सर्व भारतीयांना देशभक्तीची भूमिका पार पाडावी लागेल. नेते आणि सेलिब्रिटी आपली भूमिका बजावतील. वांगचुक म्हणाले की तिबेटमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, सहा हजार मंदिरे तोडली गेली पण जग शांत राहिले. मुस्लिमांच्या हिताच्या नावाखाली मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्या देशांना प्रश्न विचारत म्हणाले की, १० लाख उइगर मुस्लिमांना तुरुंगात बंद केले गेले. मशिदी पाडण्यात आल्या पण कोणी काही बोलले नाही. ते म्हणाले की, या आर्थिक गुलामगिरीमुळे पाकिस्तान आता चीनची वसाहत बनला आहे. चीन हळूहळू त्यांच्या संसाधनांवर कब्जा करत आहे. श्रीलंकेतही आज अशीच परिस्थिती आहे. आपण त्यांच्याशी व्यवसाय कसा करू शकतो.

लोकांना व्हॉलेट पॉवरने चीनला उत्तर द्यावे लागेल
वांगचुक यांनी असा प्रश्न केला की, १९६२ पासून चीन सतत घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. आता सैन्य पुढे उभे आहे, पण आपल्यालाही उत्तर द्यावे लागेल. आता व्हॉलेट पॉवरने उत्तर द्यावे लागेल. आता गप्प बसू शकत नाही. कारण जुलूम सहन करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आता जनतेने आपली शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे. सरकार पाऊल उचलेल याची वाट पाहता येणार नाही. सरकारचे आपले निर्बंध आहेत, पण जनतेला निर्णय घ्यावा लागेल.

आता देशासाठी जगण्याची सवय लावावी लागेल
ते म्हणाले की आपण आवाज उठवला पाहिजे. आपल्या व्हॉलेटची ताकद ओळखली पाहिजे. काही काळ थोडी कमतरता येऊ शकते. आपण थोडा प्रयत्न करू. आयुष्यात काही तत्त्वेही आहेत. आता देशासाठी जगायला शिकले पाहिजे. ते म्हणाले की, आपल्याला कमी संसाधनांमध्ये जगण्याची सवय लावावी लागेल. काही वेळात सर्व काही आपोआप दुरुस्त होईल.

‘बुलेट नाही व्हॉलेट’चा मंत्र दिला होता
दोन दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यांनी ‘बुलेट नाही व्हॉलेट’ असा मंत्र दिला होता. त्यांनी चीनच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या मोहिमेचे अनेक चित्रपट कलाकार, उद्योग संस्था आणि बाबा रामदेव यांनी समर्थन केले होते. आमिर खानच्या सुपरहिट चित्रपट ३ इडियट्सचे मुख्य पात्र फुंसुख वांगडु रोमन मॅगसेस पुरस्कार विजेते वांगचूक यांच्यावरच आधारित होते.