आणखी एका PMC बँक खातेदाराचा मृत्यू

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या चालू असलेल्या पीएमसी बॅंकेच्या अडचणींमुळे सर्व खातेदार चिंतेत पडले आहे. आपल्या ठेवी व पैसे मिळतील की बुडतील असा मोठा प्रश्न खातेदारांच्या समोर आहे. याच चिंतेमुळे एका खातेदार महिलेचा मृत्यू झाला आहे. आपले पैसे मिळतील की नाही या चिंतेमुळे एका खातेदार महिलेचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला. ही घटना खारघरमध्ये घडली आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव कुलदिपकौर विग असे होते. त्या ६४ वर्षांच्या होत्या.

कौर यांच्या कुटुंबीयांचे पीएमसी बॅंकेमध्ये सुमारे १७ लाख रुपये अडकले होते. कुलदिपकौर यांनी बुधवारी रात्री जेवणानंतर टीव्हीवर पीएमसी बँकेसंदर्भात बातम्या बघितल्या. झोपी जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या पतीशी बँकेत अडकलेल्या पैशांसंदर्भात चिंता व्यक्त केली. त्यानंतर दोन तासांतच त्यांना त्रास जाणवू लागला. बुधवारी कुलदिपकौर या रात्री पीएमसी बॅंकेसंदर्भातील बातम्या पाहून झोपल्या आणि त्यानंतर २ तासातच त्यांचा हृदयविकराने मृत्यू झाला.

कुलदिपकौर व त्यांचे कुटुंब खारघर सेक्टर-१० मध्ये भाड्याच्या खोलीत राहत होत्या. त्यांच्या परिवारामध्ये पती, मुलगा, सून आहे. पीएमसी बॅंकेमध्ये कुलदिपकौर व त्यांचे पती वरिंदरसिंग विग, मुलगा सुखबिरसिंग या तिघांचे खाते असून त्यांचे बॅंकेमध्ये १५ लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट होते. कुलदिपसिंग व वरिदरसिंग या पतीपत्नीच्या खात्यामध्ये दीड लाख रुपयांची तर सुखबीर यांच्या खात्यामध्ये ७० हजाराची रक्कम होती. पीएमसी बॅंकेवर निर्बंध लादण्यात आल्यानंतर हे पैसे अडकले. पैसे नसल्यामुळे विग कुटुंबियांनी यावर्षी दिवाळी देखील साजरी केली नाही. त्यामुळे पैसे मिळतील की नाही या चिंतेत पुर्ण परिवार होता.

Visit : policenama.com