नौदलाच्या जवानाची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कुलाबा येथील आय एन एस या नाविक दलाच्या तळावरील क्युआरटी रुममध्ये एका नौदलाच्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. नाईक अखिलेश लालजी यादव (वय २५, रा़ आय एन एस आंग्रे, कुलाबा) असे त्याचे नाव आहे.

अखिलेश यादव हा क्युआरटी रुममध्ये गुरुवारी ड्युटीवर होता. त्याने सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास आपल्याकडील इन्सास रायफलमधून गोळी झाडून घेतली. ती त्याच्या हनुवटीच्या खालच्या बाजूस लागून त्यात तो गंभीर जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून त्याचे सहकारी धावत क्युआरटी रुममध्ये गेले.

तेव्हा त्यांना अखिलेश यादव हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्याला तातडीने कुलाबा येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. अखिलेश याने आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कुलाबा पोलिसांनी आकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

Visit : Policenama.com