Nawab Malik | नवाब मलिकांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘सगळ्यात जास्त दारु पिणारे भाजपचे नेते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील वाइन उद्योगास चालना देण्यासाठी आता सुपर मार्केट (Supermarket) तसंच ‘वॉक इन स्टोअर’ (Walk-in Stores) मध्ये वाईन विक्रीस (Wine Sale) परवानगी (Permission) देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) घेण्यात आला. शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांच्या जवळ मात्र वाइन विक्रीला परवानगी मिळणार नाही. या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. तर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांकडून याचे समर्थन केले जात आहे. विरोधकांच्या टीकेवर बोलताना राष्ट्रवादीचे नेते (NCP) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दारु पिणारे सगळ्यात जास्त भाजपचे नेते आहेत, असे विधान नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले आहे.

 

वाइन विक्री संदर्भाद मागील आठवड्यात सरकारने निर्णय घेतला असून याला भाजपने (BJP) विरोध केला आहे. शिवराज सरकारने, गोवा (Goa), हिमाचल प्रदेश सरकारने (Himachal Pradesh) असाच निर्णय घेतला होता की नाही हे भाजपने सांगावं. वाइनला विरोध होत आहे. भाजप त्यांच्या नेत्यांचे दारु बनवण्याचे परवाने परत करणार का हा आमचा प्रश्न आहे. अनेक नेते मद्य बनवत आहेत, अनेकांची तर वाइनची आणि मद्य विक्रीची दुकाने आहेत. सर्वात जास्त दारु पिणारे लोक हे भाजपात आहेत. भाजपा नेते त्यांचे परवाने परत कधी करणार आणि आजपासून दारु पिणार नाही अशी शपथ कधी घेणार ते त्यांनी सांगावे असे नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले.

वाइन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरुन बराच वाद सुरु झाला आहे. भाजपनं या मुद्यावरुन राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली असताना सरकारकडून देखील बाजू मांडली जात आहे. नवाब मलिक यांनी विरोधकांना उत्तर देताना भाजपचे नेते विखे पाटील (Vikhe Patil) यांचा दारुचा रॉकेट ब्रॅड आहे. भाजपचे खासदार सांगतात थोडी थोडी पिया करो असेही ते म्हणाले.

 

Web Title :- Nawab Malik | Maha Vikas Aghadi Minister Nawab Malik Controversial Statement On BJP Leader

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Update | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 5521 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nitesh Rane | नितेश राणे यांना मोठा दणका ! 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

 

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे’