Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यात काही दिवसांपासून ट्विटर वॉर सुरू होते. वानखेडे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी माफी देखील मागितली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मलिक चर्चेत आले आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी एक ट्विट केलं असून माझ्या घरी आज उद्या सरकारी पाहुणे येणार असल्याचे समजते. त्यांचे स्वागत आहे असे म्हंटले आहे. सध्या या ट्विटचीच चर्चा सुरू झाली आहे.

 

 

मित्रांनो, माझ्या घरी आज उद्या सरकारी पाहुणे येणार असल्याचं ऐकलंय. आम्ही त्यांचं स्वागत करतो. घाबरणं म्हणजे रोज रोज मरणं. आम्ही घाबरणार नाही. लढणार आहोत. गांधी गोऱ्यांशी लढले होते. आम्ही चोरांशी लढणार आहोत,’ असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा मलिक यांच्यावर धाड टाकणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यापूर्वी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) निकटवर्तीयांच्या घरावर, कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारले असता, ते म्हणाले, सरकारी पाहुणे येऊन गेले त्यांची भीती वाटत नाही. त्यानंतर मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटमध्ये सरकारी पाहुण्यांचा उल्लेख केल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.

 

Web Title :- Nawab Malik | modi government guests are coming my house tweets ncp leader nawab malik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा