Nawab Malik | …म्हणून नवाब मलिकांच्या ED कोठडीत वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीने (ED) अटक (Arrest) केलेले महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणी वाढत आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने (Special PMLA Court) नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या कोठडीत (ED Custody) वाढ केली आहे. मलिक यांना 7 मार्च पर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. मलिक यांना मागील आठवड्यात ईडीने 8 तास चौकशी केल्यानंतर अटक केली होती.

 

ईडीच्या मागणीनंतर विशेष पीएमएलए न्यायालयाने मलिकांच्या (Nawab Malik) कोठडीत वाढ केली आहे. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान, प्रकृती अस्वास्थेच्या कारणामुळे नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तीन दिवसांमध्ये मलिक यांची चौकशी होऊ शकली नाही. तसेच तपासातून समोर आलेल्या माहितीमुळे मलिकांना ताब्यात घेऊन चौकशी होणे अधिक गरजेचे आहे, असा ईडीच्यावतीने युक्तिवाद (Argumentation) करण्यात आला. याच मुद्यावरुन न्यायालयाने मलिक यांच्या कोडीत 7 मार्च पर्यंत वाढ केली.

ईडीकडून सहा दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. आरोपीच्या प्रकृती अस्वास्थामुळे ईडीने पूर्ण चौकशी केली नाही, असे ईडीच्या वतीने सांगण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना 7 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे निर्देश दिले. ईडीच्यावतीने ॲड. अनिल सिंह (Adv. Anil Singh) यांनी युक्तिवाद केला. तर मलिक यांच्या वतीने ॲड. अमित देसाई (Adv. Amit Desai) आणि ॲड. तारक सय्यद (Adv. Tarak Sayyed) यांनी युक्तिवाद केला.

 

Web Title :- Nawab Malik | NCP leader and minister nawab malik to ed custody till march 7

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा