Nawab Malik | रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती का?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS officer Rashmi Shukla) यांनी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांतील भ्रष्टाचाराच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन टॅपिंग (Phone tapping ) करण्यात आल्याचं शुक्ला यांनी म्हटलं आहे. आपल्याला बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोप देखील शुक्ला यांनी केलाय. यावरून राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सवाल उपस्थित केले आहेत.

Nawab Malik | rashmi shukla get permission from the cm for phone tapping question by nawab malik

मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केलीय. रश्मी शुक्ला (IPS officer Rashmi Shukla) यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांचे फोन टॅप (Phone tapping ) केले होते. तर तेव्हा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? असं नवाब मलिक यांनी प्रश्न केला आहे. त्यावेळी नवाब मलिक म्हणाले, ‘नेत्यांचे फोन टॅप (Phone tapping ) करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या असे ते म्हणाले. रश्मी शुक्लांच्या वकीलांनी न्यायालयात शासकीय परवानगी घेऊन फोन टॅप केल्याचे म्हटले आहे, परंतु, फोन टॅपिंगसाठी दिशाभूल करुन परवानगी घेण्यात आली असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय.

पुढे बोलताना नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, ‘पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना त्या
काळातील खासदार, नेते यांचे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आधीपासूनच आरोप आहे.
ज्यापध्दतीने त्या त्यांची बदली झालेली सांगत आहेत, परंतु त्यांची बदली झालेली नाही असं मलिक
यांनी म्हटलं आहे. या दरम्यान, ‘फोन टॅपिंग’साठी (Phone tapping ) शुक्ला यांनी तत्कालिन
अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांची परवानगी घेतली होती. याबाबत सादर केलेल्या अहवालाची तत्कालिन अतिरिक्त मुख्य सचिव कुंटे यांनी दखल घेतली होती. त्याचप्रमाणे त्यांनी शासनाला दिलेल्या रिपोर्टमध्ये परवानगीविषयी नमूद केले होते. यांनंतर मात्र त्यांनी या प्रकरणी दिशाभूल केली, असा दावा रश्मी शुक्ला (IPS officer Rashmi Shukla) यांच्यातर्फे न्यायालयात करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Union Home Ministry | केंद्राच्या राज्यांना महत्वाच्या सूचना; 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कडक ठेवा

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस ठाण्यात FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Nawab Malik | rashmi shukla get permission from the cm for phone tapping question by nawab malik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update