हैदराबाद : तेलंगणा राज्यातील कोत्तागुडम जिल्ह्यात सक्रीय असलेला नक्षल (Naxal ) कमांडर आयतू ऊर्फ कोरसा गंगा याचा कोरोनावर उपचार सुरु असताना गुरुवारी येथील सरकारी रुग्णालयात मृत्यु झाला. दरम्यान, त्याला रुग्णालयात पोहोचवून परत जाणार्या तीन नक्षलवाद्यांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली होती. हे नक्षलवादी (Naxal ) कोत्तगुडम जिल्ह्यातील खम्मम गावात फिरत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सवलम पोजा, सोढी सितैया, कुंजाम जोगेया अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी बटालियनचे बेक कमांडर कोरसा गंगा ऊर्फ आयतू याला कोरोनाची लागण झाली असून त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतल्यानंतर त्यांना दोन दिवसांपासून आयतूवर येथे उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांच्या गाडीची तपासणी केल्यावर त्यात जिलेटिन कांड्या, बॅटरी, कॉर्डेक्स, डेटोनेटर सह विस्फोटाची सामुग्री मिळाली होती. या नक्षलवाद्यांनी सांगितले की, आयतुला अनेक दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. जंगलामध्ये डॉक्टरांनी त्याच्यावर उपचारही केले. मात्र, त्याची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
जंगलात राहणारे नक्षलवादी नेते सोबराई, राजेश, नंदू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर जंगलातच उपचार करण्यात येत आहे. जंगलात असलेल्या अनेक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अटक केलेल्या नक्षलवाद्यांनी सांगितले आहे. पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांनी सांगितले की, नक्षलवादी नेते कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यांना आमचे आवाहन आहे की, त्यांनी नक्षलवादी संघटना सोडून आमच्याजवळ यावे. आम्ही त्यांच्यावर उपचार करतो. नक्षलवादी निर्दोष आदिवासींच्या बरोबर बैठका घेऊन त्यांच्या कोरोना पसरवत आहे. गावकर्यांना आमचे आवाहन आहे की, त्यांनी नक्षलवाद्यांच्या बैठकांना जाऊ नये.
कोत्तागुडम जिल्हा छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याला लागून आहे. सुकमा जिल्ह्यातही अनेक नक्षलवादी कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातही नक्षलवाद्यांची मोठी संख्या आहे. त्यांच्यामध्येही कोरोनाचा फैलाव झाला असल्याची शक्यता आहे.
तुळशीसह ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, फुफ्फुसे एकदम मजबुत अन् निरोगी बनतील, जाणून घ्या
‘या’ लोकांनी पिऊ नये हळदीचे दूध, फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान
पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकासह 5 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल; प्रचंड खळबळ
रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल