NCP-BJP | भाजपला मोठा धक्का ! पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याची कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये ‘एन्ट्री’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – NCP-BJP | महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या (Maharashtra Assembly Election 2019) वेळी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला गळती लागलेली पाहायला मिळाली होती. दोन्ही पक्षातील नेते आपल्या पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत होते. मात्र आता गेलेले नेते पुन्हा घरवापसी करताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिराळा (Shirala) मतदारसंघातील भाजप नेते शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik Join NCP) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. (NCP-BJP)

 

शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी योग्य वागणूक दिली नसल्याचं नाईक म्हणाले. नाईक यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) हे यावेळी उपस्थित होते. (NCP-BJP)

 

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात चंद्रकांत पाटलांचा वेगळा हेतू आहे, मात्र त्याचा परिणाम आम्हाला इथे सहन करावा लागला. ज्या पद्धतीची वागणूक हवी होती, ती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही राजीनामा देत असल्याचं शिवाजीराव नाईक यांनी सांगितलं.

 

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांचा शिराळा मतदारसंघात पराभव झाला होता.
नाईक यांचा 76002 इतकी मते पडली होतीत. त्यामुळे आता राष्ट्रवादीला सांगली जिल्ह्यात आणखी बळकटी मिळाली आहे.

 

Web Title :- NCP-BJP | shivajirao naik leave bjp and join ncp in presence on sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा