NCP Chief Sharad Pawar | ‘व्यक्तिश: मला ‘घड्याळ’ चिन्हाची चिंता नाही, माझ्या आयुष्यात मी…’, शरद पवार असं का म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) असे दोन गट पडले आहेत. अजित पवारांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेत शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला आहे. पक्ष (Party) आणि पक्ष चिन्ह (Party Symbol) आमचेच आहे, असंही अजित पवार गटाने म्हटले आहे. तर मला घड्याळ चिन्हाची चिंता नाही, असं विधान शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केलं आहे. ते बुधवारी (दि.16) छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय त्यांचा स्वत:चा असेल तर चिंता नाही. मात्र, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेबाबतीत (Shiv Sena) जो निर्णय झाला, त्यात केंद्र सरकारमधील (Central Government) शक्तिशाली घटकाचा हस्तक्षेप झाला आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol), नावाचा निकाल आला. तो प्रयोग आमच्या बाबतीत सुरु असल्याचे दिसते. (Maharashtra Political News) पण या प्रकारच्या मागण्या निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. त्याचा खुलासा आमच्याकडे आयोगाने मागितला. ते बघितल्यानंतर निश्चित आम्हाला काळजी वाटते.

मला चिन्हाची चिंता नाही

व्यक्तीश: मला चिन्हाची चिंता नाही. माझ्या आयुष्यात मी 14 निवडणूका लढवल्या. सुदैवाने प्रत्येक निवडणूकीत मला जनतेने विजयी केले. 1967 साली मी पहिली निवडणूक लढलो तेव्हा माझं चिन्ह बैलजोडी होते. त्यानंतर चरखा, गाय-वासरु, हात अशा चिन्हांवर मी लढलो. आणि शेवटची निवडणूक मी लढलो ते चिन्ह घड्याळ होते. आज इतके चिन्ह असताना आम्ही निवडणूक जिंकलो. त्यामुळे मला चिन्हाची चिंता नाही. पण सत्तेचा गैरवापर होत आहे. केंद्रातील अधिकाराचा गैरवापर करुन राजकीय पक्ष, शक्ती कशी अडचणीत आणता येईल हे त्यांचे धोरण आहे असा निशाणा शरद पवारांनी भाजपवर (BJP) साधला.

सध्याचे चित्र मोदी सरकारला अनुकूल नाही

ज्यावेळी आपल्याला यश मिळणार नाही याची खात्री पटते तेव्हा माणूस या मार्गाला जातो. मला सध्या देशातील चित्र
मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही. हिंदुस्तानचा नकाशा पाहिला तर केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा,
राजस्थान, दिल्ली, पंजाब, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही.
महाराष्ट्रात भाजप सरकार कसं सगळ्यांना माहिती आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडून आले.
निवडणुकीपूर्वी भाजपची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार जनतेने केलाय.
त्यामुळे मी पुन्हा येईन असं कितीही म्हटलं तरी त्यांची स्थिती देवेंद्रसारखी (Devendra Fadnavis) होईल
याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | कुटुंबात कधीही राजकारण आणत नाही, अजित पवार भेटीवर शरद पवारांचं पुन्हा स्पष्टीकरण