NCP Chief Sharad Pawar | शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ (NCP Delegation) मुंबई पोलीस आयुक्तांच्या (Mumbai Police Commissioner) भेटीला गेले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी गेले आहे. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

 

‘भाडखाउ तुझा दाभोळकर केला जाईल. अशा स्वरूपाची धमकी ट्विटरद्वारे देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) या ट्विटरवर हँडलवरुन ही धमकी देण्यात आले असल्याचे समजते. शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल करत कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

Advt.

Web Title :  maharashtra politics NCP Chief sharad pawar death threat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा