NCP Chief Sharad Pawar | आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी होणार ? शरद पवारांचे सूचक वक्तव्य (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. महाविकास आघाडीच्या रुपात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झालेल्या काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीलाही (NCP) सत्ता सोडावी लागली. पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राज्यातील आगामी निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र यायला हवे असे म्हणत आघाडीचे संकेत दिले आहेत.

 

नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादीशी शक्य तिथे युती करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी दिले असताना आता शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी देखील या भूमिकेचे समर्थन केले आहे. आगामी निवडणुकीत (Election) शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र लढायला हवं, काँग्रेससोबतची चर्चा करायला हवी, असं वक्तव्य केलंय. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शरद पवार एका कार्यक्रमासाठी आज सकाळी नागपुरात आले आहेत.
त्यांनी पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, संसदेत (Parliament) बोलताना एखाद्या विषयावर सरकारकडे मागणी केली आणि मान्य झाली नाही तर विरोधक सभात्याग करतात.
बाहेर असलेल्या महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुतळ्यासमोर धरणे देतात.
आता केंद्र सरकारने (Central Government) एक परिपत्रक काढून या अधिकारावरील बंदी आणली आहे.
हे करताना देशातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतलं होतं का,
असा सवाल करीत याबाबत उद्या दिल्लीत बैठक होईल आणि आमची दिशा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp shiv sena congress should fight together in upcoming elections after uddhav thackeray sharad pawars opinion amid upcoming elections

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा