NCP Chief Sharad Pawar | १४३ खासदारांचं निलंबन का झालं? शरद पवारांनी सांगितलं कारवाई मागचं कारण

नवी दिल्ली : NCP Chief Sharad Pawar | देशात पहिल्यांदाच लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या १४३ खासदारांना निलंबित (143 MPs Suspended) करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनीही भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. तसेच निलंबन करण्यामागील कारण सांगितले.

शरद पवार म्हणाले, संसदेचे सदस्य नसताना काही लोक सदनमध्ये आले, या लोकांना पास कुठून मिळाला. ते सदनमध्ये कसे आले? याबाबत सरकारकडून माहिती मिळण्याची आवश्यक होते. सदनचा तो अधिकार होता. आम्ही स्टेटमेंटची मागणी केली होती, तेच त्यांनी दिलेली नाही. यामुळेच सदनमधील सदस्यांना निलंबित केले. आजपर्यंत अशी गोष्ट कधीही झालेली नाही.

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, सध्या विरोधी पक्षाला दुर्लक्ष करुन काम करणे सुरू आहे.
पण, देशाची जनता हे सर्व पाहत आहे. जी मिमिक्री केली ती सदनच्या बाहेर केली आहे. संसदेत बोलू दिले जात नाही.
खासदारांनी सरकारला प्रश्न विचारले म्हणून त्यांना निलंबित केले. खासदारांचे असे निलंबन करणे चुकीचे आहे.

दरम्यान, १४३ खासदारांचे निलंबन झाल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.
इंडिया आघाडीने (India Alliance) शुक्रवारी सरकारविरोधी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Police News | शिक्के चोरून बनवले बनावट फिटनेस सर्टिफिकेट, एकाला अटक; ससून हॉस्पिटलमधील प्रकार

Vijay Wadettiwar | ”मराठा समाजाला पुन्हा लॉलीपॉप देण्याचा सरकारचा प्रयत्न”, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

Ajit Pawar Group | आव्हाडांनी मारलेला बाण अचूक लागला! भाजपा-आरएसएस बैठकीच्या दाव्यानंतर अजित पवार गटाला कळ

Police Accident News | नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, नारायणगाव पोलीस ठाण्यातील पोलिसाचा मृत्यू