NCP Chief Sharad Pawar | शरद पवरांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली; म्हणाले – ‘ज्यांनी मला जातीवादी म्हणून…’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आपल्या सभांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर थेट टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढीला लागला असून शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे नास्तिक असल्याचे राज ठाकरे यांनी सभेत बोलून दाखवले होते. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी सातारा येथील एका कार्यक्रमात बोलताना प्रत्युत्तर देताना टोला लगावला आहे.

 

रयत शिक्षण संस्थेचे (Rayat Shikshan Sanstha) संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्या 63 व्या स्मृतिदिनानिमित्त सातारा येथे त्यांच्या समाधीस्थळावर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर संस्थेच्या प्रांगणात झालेल्या समारंभात शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) बोलत होते.

 

शरद पवार म्हणाले, ज्यांनी जातीवादी म्हणून मला हिणवलं त्याचा मी आस्वाद घेतला. अशा प्रकारची वक्तव्य केल्यामुळे लोक हसतात, पण अशी वक्तव्ये ते गांभीर्याने घेत नाहीत. लोकं ऐकतात आणि सोडून देतात, असे ते म्हणाले. शरद पवार यांनी राज ठाकरेंना गांभीर्याने घेत नसल्याचे सांगितले. देशात महागाई, बेकारी वाढली आहे. या विषयांकडे न पाहता भोंग्याचा विषय घेतला जातोय. ज्यांना आधार नाही ते अशा प्रकारे लोकांचं मन भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली.

ओबीसी आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील
यावेळी बोलताना शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) आणि भोंग्याच्या  (Azaan Loudspeakers) मुद्यावर भाष्य केले.
ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री (CM) आणि जाणकार योग्य तो निर्णय घेतील.
जो सर्वांना मान्य असेल असाच निर्णय घेतील. त्याची अंमलबजावणी कधी होईल याकडे आमचे लक्ष असले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

 

रयतचं विद्यापीठ लवकरच सुरु होईल
रयतचं स्वत:चं विद्यापीठ (University) असावं हे आपल्या सर्वांचे स्वप्न होतं. त्याचा पाठपुरावा सुरू होता.
त्याला केंद्र (Central Government) आणि राज्य सरकारने (State Government) परवानगी दिली आहे.
आवश्यक बाबींची पुर्तता झाल्यानंतर येत्या जूनपासून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ (Padmabhushan Dr. Karmaveer Bhaurao Patil University) सुरु करु शकू,
असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

 

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar | sharad pawar people listen laugh and leave sharad pawar mocked raj thackeray after rally of aurangabad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील ‘JITO Connect 2022’ प्रदर्शनात चोरट्यांकडून हिरेजडीत ब्रेसलेटसह लाखोंचा ऐवज लंपास

 

Pune Aam Aadmi Party | प्रशासकांना हाताशी धरून अजित पवार यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय घेतला, आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

 

Free मध्ये Disney+Hotstar वर पहा IPL आणि आपले फेव्हरेट Shows! द्यावे लागणार नाही पैसे, जाणून घ्या Secret