Pune Crime | पुण्यातील ‘JITO Connect 2022’ प्रदर्शनात चोरट्यांकडून हिरेजडीत ब्रेसलेटसह लाखोंचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडी परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘जितो कनेक्ट 2022’ (JITO Connect 2022) या व्यापार विषयक प्रदर्शनामध्ये (Exhibition) चोरट्यांनी (Thieves) लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांनी प्रदर्शनातील चार स्टॉलमधून 5 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. पोलिसांनी (Pune Police) प्रदर्शनाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

 

याप्रकरणी व्यावसायिक निलेश पारख Nilesh Parakh (वय-47 रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवार (दि.7) आणि रविवार (दि.8) रोजी घडला आहे. (Pune Crime)

 

कोंढवा रस्त्यावरील गंगाधाम अनेक्समध्ये (Gangadham Anex) ‘जितो कनेक्ट 2022’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन (International Exhibitions) सुरु आहे. त्याठिकाणी नीलेश यांच्यासह प्रशांत लुनावत (Prashant Lunawat) व प्रतिक रांका (Pratik Ranka) यांनी स्टॉल उभारले होते. त्यावेळी चोरट्यांनी तात्पुरत्या बांधलेल्या कपडे विक्रीचे स्टॉलचे काऊंटरमधून रोख रक्कम (Cash), डायमंडचे ब्रेसलेट (Diamond Bracelet), दोन मोबाइल (Mobile) असा एकूण 4 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग (PSI Sanjay Adling) यांनी दिली.

 

Web Title :- Pune Crime | JITO Connect 2022 pune thieves stole rs 5 lakh international exhibition

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule on Navneet Rana | ‘…म्हणून मी नवनीत राणा या विषयाकडे गांभीर्याने बघत नाही’ – खा. सुप्रिया सुळे

 

Amisha Patel Hugs Sanjay Raut | अमिषा पटेलनं दिली थेट संजय राऊतांना ‘जादू की झप्पी’..पाहा व्हायरल व्हिडिओ..!

 

D Gang Terror Funding Case | मुंबईत NIA च्या धाडीत धक्कादायक माहिती समोर, दाऊदचा डाव उधळला ! आणखी 87 जण ‘रडार’ वर