NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांचे कथित ओबीसी प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल, चर्चेला उधाण, ‘या’ समर्थकाने दिले स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचे कथित जात प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. कारण हे प्रमाणपत्र ओबीसी (OBC Certificate) प्रवर्गात मोडणारे आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यास अनेक नेते विरोध करत आहेत, शिवाय ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लावता मराठा आरक्षण (Maratha Reservation) द्यावे, असे मत अनेक मराठा नेते व्यक्त करत आहेत. पवार यांचा कथित ओबीसी दाखला व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत आता शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) समर्थक विकास पासलकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

विकास पासलकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. हे षडयंत्र अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रातील जे षडयंत्रकारी लोक आहेत, त्यांना कुठून तरी रसद पुरवली जात आहे. शरद पवारांचं (NCP Chief Sharad Pawar) बारामतीमध्ये शिक्षण झाले आहे, याचा धडधडीत पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे हे सर्व षडयंत्राचा भाग आहे.

विकास पासलकर म्हणाले, मागील कित्येक वर्षांपासून शरद पवारांविरोधात षडयंत्र सुरू आहे.
परंतु जेव्हा सामाजिक विषय असतो. तेव्हा आम्हाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन अशा विषयांमध्ये खोलात जावे लागते.
एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी व्हिटामिन कुठून पुरवले जात आहे, हे शोधणे गरजेचे आहे.
हे सगळे नागपूर सेंटरकडून घडत आहे, असे म्हणत पासलकर यांनी भाजपा आणि आरएसएसकडे बोट दाखवले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : फ्लॅट न देता 80 लाखांची फसवणूक, भल्ला इस्टेट प्रा. लि. च्या संचालकावर FIR