NCP Dr. Amol Kolhe | अजित पवारांच्या आव्हानावर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया, ”शिरूरमधून मी 100 टक्के…”

मुंबई : NCP Dr. Amol Kolhe | मी शिरूर मतदारसंघाचे (Shirur Loksabha Constituency) प्रतिनिधित्व करत आहे. शिरूरचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम शरद पवारांनी (Sharad Pawar) केले. निवडणूक एकमेकांना आव्हान देण्याची गोष्ट नाही तर प्रतिनिधित्व आणि प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे. मी १०० टक्के निवडणूक लढवणार आहे. शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे (NCP Dr. Amol Kolhe) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) प्रतिआव्हान दिले आहे.

शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त करत अमोल कोल्हेंना आव्हान दिले होते. यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवार हे मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला ते आव्हान देतील, असे वाटत नाही. कारण, शिरूर मतदारसंघातील कामांचे अजित पवारांनी कौतुक केले आहे.

अमोल कोल्हे (NCP Dr. Amol Kolhe) म्हणाले, पदयात्रा सूचण्याचा विषय नाही. कांद्याच्या निर्यातीबाबत शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न पदयात्रेतून मांडणार आहोत. अजित पवारांनी पदयात्रेला पाठिंबा दिला पाहिजे. कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासाठी अजित पवारांनी आमच्या सुरात सूर मिसळला पाहिजे.

काय म्हणाले होते अजित पवार…
खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले होते की, एका खासदाराने मतदारसंघात पाच वर्षे
लक्ष दिले असते, तर खूप चांगले झाले असते. त्या खासदाराला उमेदवारी देण्याचे काम मी केले.
तसेच, निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी जिवाचे रान केले आहे.

मधल्या काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. पूर्णपणे दुर्लक्ष केले. मी एक कलावंत आहे,
माझ्या चित्रपटांवर परिणाम होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही.
याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होत आहे, असे वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती.
मी हे बोलणार नव्हतो. पण, निवडणुका आल्याने यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहे.

तेव्हा योग्य पद्धतीने उमेदवारी दिली होती. आम्ही जनाधार पाहून उमेदवारी देतो. निवडून आल्यानंतर कसे काम करायचे,
हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. मात्र, आता शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच, असे अजित पवार म्हणाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | शरद पवारांनी परखड शब्दात अजित पवारांना सुनावले, ”माझे बंड यांच्यासारखे…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना

Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर पलटवार, ”गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून…”