Sharad Pawar | शरद पवारांनी परखड शब्दात अजित पवारांना सुनावले, ”माझे बंड यांच्यासारखे…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar | माझे बंड नव्हतेच. आमच्या काळात आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) त्यावेळी महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचा विचार घेऊनच निर्णय घेतला. त्यासंबंधी आज तक्रार करण्याचे काही कारण नाही. आज कुणी काही केले त्याचीही तक्रार नाही. फक्त लोकांनी ज्या पक्षाला शक्ती दिली, त्याचा संस्थापक कोण आहे? या सर्व गोष्टी सर्वांच्या समोर आहेतच. त्यामुळे मला अधिक चर्चा करायची नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना परखड शब्दात सुनावले आहे. ते बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

काल बारामती येथे कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्याविरोधात केलेल्या बंडाची आठवण सांगितली. त्यावेळी शरद पवारांचे वय केवळ ३८ वर्षांचे होते. माझे वय आता साठीच्या पलीकडे आहे, असे ते म्हणाले होते. या टीकेवर आज शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, ही गोष्ट खरी आहे. बारामतीमध्ये मागच्या दहा वर्षात माझे लक्ष नाही.
येथील स्थानिक निवडणुका, साखर कारखाने, शैक्षणिक संस्थाबाबत मी निर्णय घेतलेले नाहीत.
त्यामुळे या क्षेत्रात कुणी काम करावे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. या भागात ज्यांना काम करायचे आहे, त्याने करावे.
सर्वांना सोबत घेऊन या भागाचा विकास व्हावा, हिच इच्छा आहे.
राज्यात मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची काळजी घेतली, याचा मला आनंद वाटतो.

अजित पवार यांनी म्हटले होते की, विरोधकांकडे लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोर
तोडीचा उमेदवार नाही. यावर बोलताना १९७७ च्या निवडणुकीचा दाखला देत शरद पवार म्हणाले,
जनतेने निर्णय घेतल्यानंतर बलाढ्य वाटणाऱ्यांचाही पराभव जनतेकडून केला जातो.

एबीपी – सी व्होटरच्या सव्र्हेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, सर्व्हे नेहमी वेगवेगळे सांगतात.
त्या सर्वच बाबी खऱ्या ठरतत नाही. पाच राज्यातील निवडणुकांचे सव्र्हे खरे ठरले नव्हते. तेलंगणाचा सव्र्हे वेगळा होता,
निकाल वेगळाच लागला. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील अंदाज चुकीचे ठरले होते.
सव्र्हेतून काही संकेत मिळतात, इथपर्यंत ठिक आहे. पण त्यातून निकाल तसाच लागेल, असे नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना

Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर पलटवार, ”गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून…”