NCP Jayant Patil | जयंत पाटील अजित पवार गटाच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Jayant Patil | आमच्याकडे अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखाली 45 आमदार आहेत. ते एकत्र आहेत. मंगळवारीही आमची बैठक झाली होती. आमचे आमदार एकसंघ आहेत. आणखीही आमदार येतील. जे बोलणारे आहेत ते देखील येतील असा दावा मंत्री धर्मरावबाब आत्राम (Minister Dharmaraobab Atram) यांनी करत शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे.

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून आमच्या सर्व आमदार, कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे काम मंत्री करत आहेत. आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. आधी अनेक आमदारांना विचारलेही जात नव्हते. अजितदादा डॅशिंग नेते आणि प्रशासनावर पकडही आहे. त्यामुळे अजित पवारांवर विश्वास ठेऊन अनेक आमदार त्यांच्यासोबत आले आहेत, असंही आत्राम यांनी सांगितले.

मविआ सरकरार असताना अजित दादांनी आमदारांना, खासदारांना भरपूर निधी दिला होता. त्यानंतर दुसरं सरकार आल्यानंतर त्यावर स्थगिती मिळाली होती. मात्र, अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि स्थगिती उठली. सगळ्या आमदारांच्या मतदारसंघातील कामे जोरात सुरु आहेत. जे आमदार नाराजीत होते, विरोधी बाकांवर समाधानी नव्हते, ते आता सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघात काम करत आहेत. सगळ्यांना विश्वासात घेऊन महायुतीमध्ये आमदारांना एकत्र ठेवले जात आहे. लोकसभेत 45 तर विधानसभेत 200 हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे मिशन आहे त्यादृष्टीने तयारी करत असल्याचे मंत्री आत्राम यांनी सांगितले.

आमदारांचा आकडा 53 वर जाणार

शरद पवार गटाचे उरलेले आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच आमच्या आमदारांचा आकडा हा 53 वर पोहचणार आहे.
आमची लोकसभेची मिशन 45 ची तयारी सुरु झाली असून मी गडचिरोली लोकसभा मतदार संघात (Gadchiroli Lok Sabha Constituency) लढायला इच्छुक असून त्या तयारीच्या कामाला देखील लागल्याचे आत्राम यांनी सांगितले. धर्मरावबाबा आत्राम पुढे म्हणाले, ज्यांना ज्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आदेश देतील त्यांना लोकसभेत उभं राहावे लागेल. पक्ष मजबुतीसाठी, मोदी सरकारचे (Modi Government) हात बळकट करण्यासाठी उभे राहावे लागेल. आमच्याकडे 53 आमदार होतील, कुठलाही गट राहणार नाही असा दावा आत्राम यांनी केला.

काय म्हणाले होते जयंत पाटील?

अजित पवार गाटातील 15 आमदार आमच्या संपर्कात असून अनेक जणांना परत पक्षात यायचे आहे.
याबाबत विचारही सुरु आहे. परंतु अंतिम निर्णय शरद पवारच घेतील, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. जयंत पाटील यांचा हा दावा अजित पवार गटाने (Ajit Pawar Group)
फेटाळला आहे. धर्मरावबाब आत्राम यांच्या दाव्यानंतर शरद पवार गट आणि जयंत पाटील कोणती प्रतिक्रिया देतात हे
पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | पवारांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटलांची सभा, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद

Pune Crime News | ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक, पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप