राजीनामा दिल्यानंतर रात्री उशिरा अजित पवारांचा शरद पवारांना फोन, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे कालच (शुक्रवार दि 27 सप्टेंबर) सर्वांच्या समोर आले. त्यांच्या राजीनामा देण्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर सर्वांनी अजित पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणाचाही त्यांच्याशी संपर्क झाला नाही. यानंतर सूत्रांनी माहिती दिली आहे की, अजित पवार यांनी शरद पवार यांना रात्री उशिरा फोन केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी फोनवरून शरद पवार यांच्याशी संवाद साधला. इतकेच नाही तर अजित पवार यांनी शरद पवारांना भेटण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. यानंतर पवारांनीही मुंबईत भेटू असं उत्तर अजित पवारांना दिलं आहे. लवकरच आता काक-पुतण्याची बैठक होणार आहे. इतकेच नाही तर अजित पवार हे मुंबईतच आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

अजित पवारांनंतर समर्थकही आक्रमक

अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर अजित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांचे समर्थकही आता आक्रमक झाल्याचे दिसत आहे. पिपंरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनीही आपल्या पदाचा राजनीमा दिला आहे. आपल्या राजीनाम्यात जावेद शेख म्हणतात, “सत्ताधाऱ्यांकडून सुरु असलेल्या सूडाच्या राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत.” राष्ट्रादीचे शहराध्यहक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे शेख यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला.

Visit : Policenama.com