राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्‍का ! ‘या’ दिग्गज नेत्यासह 48 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत नवी मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 48 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे.

गणेश नाईक हे नवी मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. त्यांनी आपल्या 48 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीची सत्ता धोक्यात आली आहे. राष्ट्रवादी आणि अपक्ष नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

बुधवारी सायंकाळी झालेल्या विशेष सोहळ्यात गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे मुंबईतील भाजपची ताकद वाढली आहे. यावेळी बोलताना गणेश नाईक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 काश्मिरमधून रद्द करण्याचा धाडसी निर्णय आणि इतर चांगली कामे केले आहेत. तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगला विकास केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

You might also like