विकृत शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येणे क्लेशकारक, जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बॅकस्टेज कलाकारांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने 30 लाखांहून अधिक…
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बॅकस्टेज कलाकारांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने 30 लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी आभार मानण्यासाठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांसोबत शरद पोंक्षे पक्ष कार्यालयात आले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे.

विकृत शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येणे हे क्लेशकारक होते, असे टीकास्त्र त्यांनी पोंक्षे यांच्यावर सोडले. राष्ट्रवादीने बॅकटेज कलकारांना मदत केल्या बद्दल आभार मानण्यासाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासबोत शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आले होते. त्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासपीठावर विकृत शरद पोंक्षे येणे हे क्लेशकारक आणि दुर्दैवी होते, अशी टीका करतानाच पण पुरोगामी कार्यकर्त्यांचा आक्रोश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानी पडताच त्यांनी पक्षाची भूमिका अत्यंत तत्परतेने स्पष्ट केली, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी पोंक्षे यांच्यावर अत्यंत तिखट टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रवादीने रंगभूमीवर बॅकस्टेजला काम करणाऱ्या जवळपास दीड हजार कामगारांपैकी 1250 कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2500 रुपये जमा केले आहेत. 60 हजार अशा वर्कर्सना फेशशिल्ड वाटप करण्यात आली आहे. याशिवाय चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यात 50 लाख किंमतीची 5 हजार घरांचे लोखंडी पत्रे व दीड हजार ढापे देण्यात आले आहेत.
मंगळवारी (दि.23) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, माजी आमदार लक्ष्मण माने, अभिनेते शरद पोंक्षे, ट्रस्टचे विश्वस्त व माजी आमदार हेमंदत टकले आदि उपस्थित होते.

 

यावेळी अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येऊन आभार मानल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोंक्षे यांच्या झालेल्या एन्ट्रीमुळे राष्ट्रवादीतील एक गट दुखावला गेला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ट्विट करून खुलासा केला आहे. राष्ट्रवादीने बॅकस्टेज कलाकारांना आर्थिक मदत केली, त्याबद्दल आभार मानण्यासाठी पोंक्षे हे कांबळी यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले होते. यापलीकडे पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.

Total
0
Shares
Related Posts