‘EVM’, ‘VVPAT’ विषयी शंका घेणाऱ्या शरद पवारांचा आता निवडणूक अधिकाऱ्यांवरही ‘अविश्वास’

मुंबई : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि EVM आणि VVPAT विषयी शंका घेणाऱ्या शरद पवार यांनी आता मतमोजणी करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवरही शंका व्यक्त केली आहे. पवार म्हणाले की, समस्या फक्त इव्हिम किंवा व्हीव्हीपॅटसंबंधी नाही तर समस्या मतमोजणी करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्या संबंधी देखील आहे.

आम्ही या मुद्याच्या मुळाशी जाणार आहोत, यासाठी आम्ही तांत्रिक तज्ञांसोबत आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांसोबत दिल्लीमध्ये चर्चा करणार आहोत, असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, जर लोकांना असं वाटत आहे की, त्यांनी दिलेली मते त्यांच्या पसंतीच्या प्रतिनिधीला जात नाही, अशा परिस्थितीत आता ते शांत आहेत पण भविष्यात ते कायदा हातात घेऊ शकतात. आपल्याला असं होऊ द्यायचे नाही.

या आधी रविवारी शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या घरात घुसून मारणार या वाक्याचा समाचार घेतला होता. त्यांनी म्हंटले होते की, दहशतवाद्यांच्या विरोधात जी कारवाई झाली ती काश्मीरमध्ये झाली, पाकिस्तानमध्ये झाली नाही. त्यांनी म्हंटले की, सांस्कृतिक ध्रुवीकरणाचा राजकीय फायदा भाजपला झाला आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर