खा. सुप्रिया सुळेंचं सरकारला खुलं ‘आव्हान’ ! ‘मला ED किंवा CBI ची नोटीस बजावून दाखवाच’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सुरु असलेल्या संवाद दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सातत्याने जनतेशी आणि पत्रकारांशी संवाद साधत आहेत. मागील काही दिवसांपासून त्या सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करत आहेत. अशातच त्यांनी आज सरकारला एक नवे आव्हान देत ‘सरकारने माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवावी’ असे म्हटले आहे. सरकार विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी आक्रमक होत सरकारला खुले आव्हान दिले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ‘ताईंशी संवाद’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र :
‘संवाद यात्रे’त एका ठिकाणी बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना देखील चांगलेच लक्ष्य केले. महाराष्ट्र सहकार बँकेच्या घोटाळ्यात सरकारकडून अजित पवार यांचे नाव पुढे केले जाते आहे, याचे कारण म्हणजे अजित पवारांच्या नावाला असलेले वलय आणि टीआरपी असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी सहकाराचा उल्लेख ‘स्वाहाकार’ असा केला होता. त्याचा धागा पकडून सुप्रिया यांनी मुख्यमंत्र्यांना असंवेदनशील म्हटले आहे.

काल पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना हे सरकार नियम कायदे बनविताना दडपशाहीचा सतत वापर करत आहे. या जनतेची घुसमट होत असून मुळे जनता आपले आपले मतही मांडू शकत नाही. तसेच पत्रकारांनाही सततच्या धमक्या सुरु असून तेदेखील सातत्याने दबावाखाली असल्याने मोकळेपणाने बोलू शकत नाहीत हे दुर्दैव असल्याचे म्हटले होते.

आरोग्यविषयक वृत्त –