शरद पवारांची साथ सोडणाऱ्या ‘त्या’ 9 आमदारांची यादी मिळाली, चार्टर्ड विमानानं दिल्लीला रवाना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे आमदार कोण आहेत ? हे अद्याप समोर आलेलं नाही. परंतु यापैकी 9 आमदारांची यादी समोर आली आहे. मुख्य म्हणजे या 9 आमदारांना खास चार्टर्ड प्लेनने दिल्लीला पाठवण्यात आलं आहे. दिल्लीसाठी निघणाऱ्या या प्लेनच्या ऑपरेटरनं ही यादी दिल्याचे समजत आहे. दौलत दरोडा, सुनिल भुसारा, नरहरी झिरवार, संजय बनसोडे, दिलीप बनकर, अनिल पाटील, नितीन पवार, सुनील शेळके, बाबासाहेब पाटील असी या 9 आमदारांची नावे आहेत.

NCP

खास चार्टर्ड प्लेननं हे आमदार दिल्लीला जाण्याबद्दल समजल्यानंतर आता नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी सर्व आमदार पक्षासोबत असल्याचं म्हटलं होतं. जे आमदार राजभवनावर गेले ते अंधारात होते, काय घडणार याची कल्पना त्यांना नसावी असं त्यांनी म्हटलं होतं.

गेली अनेक दिवस खलबतं झाल्यानंतर काल (शुक्रवार,  दि. 22 ) शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येणार हे फायनल झालं होतं. या बैठकीला अजित पवार उपस्थित होते. परंतु दुसऱ्याच दिवशी (शनिवार, दि. 23) ते भाजप सरकारमध्ये सामील झाले. या घटनेनं मोठा राजकीय भूकंप आला.

दरम्यान यातील काही आमदार पुन्हा राष्ट्रवादी पक्षात परतले आहेत. काही जणांनी आपल्या ट्विटर, फेसबुक अकाउंट्स वर याबद्दल अपडेट दिले आहे.

Visit : Policenama.com