शिवसेनेसोबत ‘सरकार’ बनवु शकते राष्ट्रवादी, काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात सत्ता समीकर अद्याप तरी जुळून आलेले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देऊन सरकारमध्ये सामील होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अनेक प्रकारच्या चर्चाना उधाण आले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटींवरून आमचा पक्ष शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी अनुकूल असल्याचे देखील सांगितले आहे. मात्र हे सर्व यावर अवलंबून आहे की भाजप शिवसेनेला सत्तेत घेते किंवा नाही. राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले की, आम्ही 1995 प्रमाणे सेना – भाजप प्रमाणे फॉर्म्युला सुचवला आहे. यामध्ये सेनेचा मुख्यमंत्री होता तर भाजपचा उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे सेनेचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री अशी शक्यता वर्तवली जात असल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले.

काय आहे सध्याची आकडेवारी ? –

नुकत्याच पार पडलेल्या विधासभा निवडणुकीमध्ये भाजपला 105, शिवसेनेला 56, कांग्रेसला 44 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागी यश मिळाले आहे. त्यातच 13 जागांवर अपक्षांचा विजय झालेला आहे. सरकार बदलण्यासाठी कोणत्याही पक्षाला 145 आमदारांची गरज लागणार आहे. यावेळी 288 जागांसाठी सेना भाजपमध्ये युती झाली होती.

सोनिया गांधींच्या बैठकीनंतर शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले होते मात्र पत्रकारांशी बोलताना भविष्याबाबत काही सांगू शकत नाही असेही ते म्हणाले होते.

काँग्रेस नेत्यांमध्ये अशी देखील चर्चा आहे की शिवसेनेला पाठींबा हवा असेल तर त्यांना युती सोडावी लागेल त्यानंतरच शिवसेनेच्या पाठिंब्यावर चर्चा होऊ शकेल.

भाजप विरोधात काँग्रेसची रणनीती –

काँग्रेसच्या एका बैठकीत भाजपला सत्तेपासून रोखण्या संदर्भात चर्चा झाली असल्याचे समोर आले आहे. एका काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने याबाबत बोलताना सांगितले की काँग्रेसचे पहिले लक्ष हे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आहे.

शिवसेनेच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह –

सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे हे नेते उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीच्या एका नेत्याने हे सांगितले की शिवसेना फक्त दबाव तंत्राचा वापर करत आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासावर जरा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्याने हे देखील स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे जेव्हा दोनीही पार्ट्यांना स्वतःहून निमंत्रण देतील तेव्हाच सत्तेबाबत हालचाली सुरु होऊ शकतील. तसेच शरद पवार यांना दिल्लीमध्ये पुन्हा मुख्यमंत्री पदाबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी नकार दिला.

Visit : Policenama.com