NCP MLA Rohit Pawar | रोहित पवार ईडीसमोर हजर; सुप्रिया सुळे म्हणाल्या – ”हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा, आम्ही…”

मुंबई : NCP MLA Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांना ईडीने (ED Inquiry) बजावलेल्या नोटीशीनुसार ते आज ईडी कार्यालयात हजर झाले. तत्पूर्वी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रोहित पवार यांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, सध्याचा काळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकुणच विरोधी पक्षांसाठी संघर्षाचा आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्याचा विजय होईल. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. आव्हाने येत राहतील. त्यांच्यावर मात करू, पण सत्याच्या मार्गाने चालू. यशवंतराव चव्हाणांचा हा वारसा पुढे नेण्याचे काम शरद पवार (Sharad Pawar) यांनी सहा दशकांपासून केलेय. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दुर्दैवाने अनेक तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. संसदेत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तीकर विभाग, सीबीआय आणि ईडीच्या ९० ते ९५ टक्के केसेस विरोधी पक्षांवर आहेत. त्यामुळे रोहितला नोटीस येणे आश्चर्याची गोष्ट नाही. रोहित नवीन पिढीसाठी काहीतरी करू इच्छित असल्याने हे सुडाचे राजकारण आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही येथे जमणे हे शक्तीप्रदर्शन नाही. काही बाबतीत प्रेमही असते, नातीही असतात.
जर कार्यकत्र्यांना वाटत असेल की आपला भाऊ खंबीरपणे लढतोय तर त्याच्यासाठी आपण यावे, तर त्यात गैर काय?
असा सवाल खासदार सुळे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कोंढवा परिसरातील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 94 वी कारवाई

बहिणीसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन चुलत भावाचा खून, आरोपीसह साथीदाराला वाकड पोलिसांकडून अटक

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, येरवडा परिसरातील प्रकार

संपूर्ण राज्यात हुडहुडी; पुण्यात हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद

हडपसर परिसरात दोन टोळक्यामध्ये राडा, सराईत गुन्हेगारासह 6 जणांना अटक

पुणे : बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल

कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, एकाला अटक; लष्कर परिसरातील घटना

चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

मौजमजेसाठी रिक्षा चोरणारा भारती विद्यापीठ पोलिसांकडून गजाआड, दोन रिक्षा जप्त

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार देणाऱ्या तरुणाला समर्थ पोलिसांकडून अटक