NCP MLA Rohit Pawar | ‘भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला, महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय’, रोहित पवारांचा भाजपवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यातच आता राज्यसभा खासदार आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी दिल्लीत एका हिंदी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात बोलताना वादग्रस्त विधान केलं. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली, असे वक्तव्य त्रिवेदी यांनी केले. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. ‘भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला, महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय’, अशा शब्दात रोहित पवारांनी (NCP MLA Rohit Pawar) भाजपवर कडक शब्दात टीका केली आहे.

 

 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आता हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतावर एकेकाने चिखलफेक करुन दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरुन पाणी चाललंय. त्यामुळे डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय.

 

काय म्हणाले सुधांशु त्रिवेदी ?

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात बोलताना भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी म्हणाले, सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोक प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावरकरांनी ब्रिटिश संविधानाची (British Constitution) शपथ तरी घेतली नव्हती, असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केले आहे.

 

 

Web Title :- NCP MLA Rohit Pawar | NCP MLA Rohit Pawar On BJP Sudhanshu Trivedi
After Congress MP Rahul Gandhi On Swatantryaveer Savarkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा