खा. उदयनराजे मोठे बंधू, भविष्यात माझ्यासोबत राहतील : शिवेंद्रराजे भोसले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीतनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मरगळ आली आहे. सत्तेपासून दूर रहाता येत नाही. मराठा आरक्षणामुळे मराठा समाज भाजपासोबत असल्याचे सांगत शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा आज दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रीया देताना उदयनराजे हे आपले मोठे बंधू असून भविष्यात ते माझ्यासोबत कायम राहतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच उद्या अकरा वाजता गरवारे हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. असे असताना देखील शिवेंद्रराजे यांनी राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे आणि आपल्यामध्ये कोणतेही वाद नसल्याचे सांगितले. तसेच ते आपले मोठे बंधू असून भविष्यात आपल्या मागे कायम राहतील असे सांगत उदयनराजे यांच्यासोबत आपले वाद नसल्याचे सांगितले.

मागील अनेक दिवसांपासून शिवेंद्रराजे भोसले हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांनी आपल्या विधानसभा सदस्याचा राजीनामा देऊन ते भाजपामध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला मात्र, शिवेंद्रराजेंचा भाजपप्रवेश रोखण्यात राष्ट्रवादीला अपयश आल्याचं दिसत आहे. शिवेंद्रराजे यांच्या भाजपा प्रवेशाने साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पडले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –