दिल्लीत 56 इंचाची छाती आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना जनतेची भीती ? : खा. अमोल कोल्हे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान अमोल कोल्हे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दिल्लीत ५६ इंचाची छाती आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना जनतेची भीती ? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. माजलगाव येथे आलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर निषाणा साधताना कोल्हे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय राज्यातली जनता आणि शेतकरी संतापला आहे. त्यांचा संयम तुटला तर तुम्हाला जनादेश यात्रा सोडून रस्त्यावर पळावे लागेल असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच ही परिस्थीती शेतकरी आणि संतप्त जनता तुमच्यावर आणेल असे ही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत पोलीस बळाचा वापर
मुख्यमंत्र्यांच्या ज्या ठिकाणी सभा असतात त्या ठिकाणच्या लोकांना स्थानबद्ध केले जाते. महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री पोलीसांच्या बळाचा वापर करत असल्याचे सांगत धुळ्यातील धर्मा पाटील यांच्या ६९ वर्षाच्या पत्नीला दोन दिवसांपर्वी स्थानबद्ध करण्यात आले होते असे कोल्हे यांनी म्हटले आहे. यावेळी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like