धनगर आरक्षणासाठी खांद्याला खांदा लावून लढणार : खा. डॉ. अमोल कोल्हे

बारामती : पोलीसनामा ऑनालाईन – राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात लागल्यानंतर मराठा आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर आता धनगर आरक्षणाची मागणी धनगर समाजासह काही नेते करत आहेत. मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाचा मुद्दा ही अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर आता नेते धनगर आरक्षणावर बोलत आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदा धनगर आरक्षणावर आपले मत व्यक्त केले आहे. बारामतीतील आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी आरक्षणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमात धनगर आरक्षणावर बोलताना अमोल कोल्हे यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले. आरक्षणाचे यश हे यात असते की आरक्षण हे आडवे जाण्यापेक्षा तळागाळापर्यंत म्हणजेच आपल्या बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे आणि या आरक्षाणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत आहे, असं अमोल कोल्हे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, अमोल कोल्हे हे आजारी असूनही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विनंतीला मान ठेवून कार्यक्रमाला उपस्थित होते. तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असले तरी तुम्ही पाच मिनिटे का होईना बारामतीच्या कार्यक्रमाला या, अशी विनंती अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना केली होती. त्यामुळेच अमोल कोल्हेंनी यावेळी उपस्थिती लावली होती.

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप