NCP MP Supriya Sule | पक्षविरोधी कृत्य केल्याने तटकरेंचे निलंबन करा; सुप्रिया सुळेंचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे (NCP MP Sunil Tatkare) यांचे निलंबन करण्याची मागणी सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी लोकसभाध्यक्षांकडे केली आहे. याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांच्याकडे सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी दिले आहे. तटकरे यांच्यावर राज्यघटनेच्या १० व्या अनुसूचीनुसार तत्काळ निलंबनाची कारवाई करवी, त्यांनी पक्ष विरोधी कृत्य केलेले आहे, अशी मागणी सुळे यांनी पत्रात केली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंडखोर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. आता अजित पवार यांनी पक्षावर हक्क सांगितला आहे. तर शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) या सर्व बंडखोरांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप केला आहे. आता हे प्रकरण निवडणूक आयोग (Election Commission) आणि सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल असून यासंबंधीच्या याचिकांवर सुनावण्या सुरु आहेत. तसेच विधानसभा अध्यक्षांकडेही दोन्ही गटांनी आपलाच गट खरा असल्याचे दावे केले आहेत. येथेही सुनावणी सुरु आहे.

आता सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्यावर निलंबनाची
कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी २ जुलै २०२३ रोजी
पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना बडतर्फ करून अपात्र करावे.
तसेच भारतीय राज्यघटनेच्या १० व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका सक्षम प्राधिकार्‍यासमोर दाखल करावी,
असा प्रस्ताव सुळे यांनी शरद पवारांकडे मांडला होता. यानंतर आता सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे.

दरम्यान, चार महिन्यांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्याची अशीच मागणी शरद पवारांनी राज्यसभेत केली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bedekar Passed Away | व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

Pune Crime News | पुणे विद्यापिठातील वसतिगृहाच्या भिंतीवर मोदींबाबत आक्षेपार्ह मजकूर, विद्यापीठाकडून पोलिसांकडे तक्रार

Pune Crime News | एक कोटीचे दागिने घेऊन सोन्याच्या दुकानातील कर्मचारी पसार, पुण्यातील घटना

Crime News | खोट्या सह्या करुन बँक खात्यातून पैसे काढून महिलेची फसवणूक, कोथरुड मधील प्रकार

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ काश्मीरमधील आणखी शाळा दत्तक घेणार – पुनीत बालन