NCP Pune City President Prashant Jagtap | ‘प्रशांत जगताप दिवसातून 16 ते 18 तास काम करणारा नेता’

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – NCP Pune City President Prashant Jagtap | पुण्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Pune NCP) अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. पक्ष नवीन होता, नवीन माणसं शोधायची होती. काम करणाऱ्या तरुणांना जवळ करायचं होतं. नवीन सभासद नोंदणीचे काम सुरू केल्यावर लक्षात आलं सर्वात जास्त सभासद नोंदणी प्रशांत जगताप यांनी केली. जवळ-जवळ 1800 सभासद प्रशांत जगताप यांनी नोंदवले होते. ज्यांनी सभासद नोंदणीमध्ये काम केलं आहे त्यालाच 1800 सभासद नोंदणी करणे किती जिकिरीचे आहे ते कळते. ज्या वयात लोक वॉर्डात काम करतात त्या वयात ना. अजित दादांशी (Ajit Pawar) बोलून प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्याच्या चिटणीस पदी निवड केली. (NCP Pune City President Prashant Jagtap)

माझ्या कार्यकाळात कार्यरत तरुण पुढे महानगरपालिकेतील Pune Municipal Corporation (PMC) दिसला. नगरसेवक (Pune Corporator) म्हणून पुण्याच्या नजरेत भरला आणि बोलता बोलता साहेब (Sharad Pawar) आणि मा. अजित दादा यांचे मन जिंकून महापौर (Pune Mayor) झालेला पहिला मिळाला. राजकारणात पाठीवर थाप टाकणारे कमी असतात व शिंतोडे उडवणारे अधिक असतात. प्रशांत जगताप यांनी त्यांच्या विरोधकांना सुद्धा शिंतोडे उडवण्याची संधी दिली नाही.

ADV

 

आज राजकारणात शुभ्र नेत्यांची आवश्यकता आहे. हीच वेळ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी साथ देण्याची .मोठ्या लोकांचे फोन यायला लागली की छोट्या लोकांचे फोन स्वीकारत नाही. प्रशांत जगताप यास अपवाद आहे. माझा फोन घेतला नाही असे सांगणारा एकही तळागाळातला कार्यकर्ता सापडणार नाही. व्यसन नसल्यामुळे ताकदीने दिवसातून 16 ते 18 तास काम करणारा नेता आहे हे माझे निरीक्षण.

 

शांतीलाल सुरतवाला (Shantilal Suratwala)

(माजी महापौर पुणे)

Web Title :- NCP Pune City President Prashant Jagtap | Prashant Jagtap is a leader who works 16 to 18 hours a day Former Mayor Shantilal Suratwala


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईतांना बंडगार्डन पोलिसांकडून अटक, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ramdas Athawale | ‘राज ठाकरेंनी मंदिरात भोंगे लावावेत पण मशिदीवरील भोंगे…’ – रामदास आठवले

Employees’ Provident Fund Organisation (EPFO Alert) ! सॅलरी लिमिट रू. 15,000 वरून वाढून रू. 21,000 करण्यावर सरकार करत आहे विचार; 75 लाख कर्मचार्‍यांना होणार फायदा